Home चंद्रपूर क्राईम :- पेपरमिल संपवले परिसरात अनोळखी प्रेत आढळले

क्राईम :- पेपरमिल संपवले परिसरात अनोळखी प्रेत आढळले

गुंडगिरीचा बळी असल्याची परिसरात चर्चा, अनोळखी व्यक्तीची ओळख पटविन्यासाठी पोलिसांची दमछाक.

बल्लारपूर. प्रतिनिधी :-

बल्लारपूर शहर हे अवैध धंदे व गुंडगिरीचे माहेरघर झाले असून शूल्लक कारणावरून इथे खून आणि खुनी हल्ले होत असते त्याच्याच सारखी परिस्थिती आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास पेपरमिल संपवेल परिसरात अज्ञात प्रेत आढळल्याने समोर आली असून नेमके हे प्रेत कुणाचे आहेत. याबाबत अजून ओळख पटली नाही.मात्र स्थानिक पोलिसांची  त्याचा शोध घेतांना पुरती दमछाक होत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार पेपरमिल संपवले आणि ऐतिहासिक किल्ला परिसरात काही कुख्यात गुंडाकडून मागील काही दिवसांपासून शस्त्र लापविण्याच्या तक्रारी येत होत्या. त्यातच आज संपवले परिसरात अज्ञात प्रेत आढळून आले आहेत. त्यामुळे हा घातपात तर नाही ना? असा संशय स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहेत. त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या या सुचनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहेत.

पेपरमिल परिसरातील संपवले परिसरात मोठ्या प्रमाणात अलीकडे झाडे झुडपे वाढलेली आहेत. स्थानिक काही गुंड याच झुडपंचा आश्रय घेऊन गांजा, दारू आणि ईतर मादक पदार्थांचे सेवन करून दिवसभर शहरात उद्रेक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचा प्रत्यक्ष त्रास स्थानिक नागरिकांना होत असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढवा असे मत स्थानिक नागरिकांच्या वतीने वर्तविले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here