आजपर्यंत फक्त नथुराम गोडसे हाच गांधीजींचा हत्त्यारा सगळ्यांना माहीत आहेत.
न्यूज नेटवर्क :-
आजपर्यंतच्या काळात महात्मा गांधी यांच्या हत्येचा जेव्हाही विषय येतो तेव्हा प्रत्येकाच्या तोंडात एकच नाव आणि डोळ्यांसमोर एक चेहरा येतो तो म्हणजे नथुराम गोडसे यांचा. परंतु 30 जानेवारी 1948 रोजीची घडलेली घटना सामान्य नव्हती. कारण संध्याकाळी संपूर्ण देश ज्यांना बापू म्हणायचा त्या महात्मा गांधींवर गोळ्या झाडण्यात आल्या. गांधींसारख्या अथांग व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीला संपवण्याचे काम कुणीही एकटा व्यक्ती करू शकत नव्हता, कारण या कटात अनेक आरोपी सहभागी होते हे पोलीस तपासात समोर आले. महात्मा गांधी हत्या प्रकरणात एकूण 9 जणांवर पोलीसांनी दोषारोपपत्र कोर्टात दाखल केले आणि कोर्टाने त्या सर्वाना आरोपी केले होते, त्यापैकी दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती तर बाकीच्यांना सोडून देण्यात आले होते.
खरं तर गांधी हत्याकांडामध्ये फाशीची शिक्षा भोगलेल्या पहिल्या व्यक्तीचं नाव म्हणजे नथुराम गोडसे सगळ्यांना माहित आहेत. पण या प्रकरणात आणखी एका व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यांचं नाव आहे नारायण आपटे. आपटे हे हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते आणि गोडसे यांच्याप्रमाणेच त्यांना 15 नोव्हेंबर 1949 रोजी अंबाला तुरूंगात फाशी देण्यात आली.
तत्कालीन पोलीस तपासणी दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, नारायण आपटे यांचा जन्म 1911 मध्ये एका अभिजात ब्राह्मण कुटुंबात झाला. बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून सायन्सची पदवी घेतल्यानंतर त्यांनी सर्व प्रकारची कामे केली. 1932 मध्ये त्यांनी अहमदनगरमध्ये शिक्षक म्हणून काम करण्यास सुरवात केली. आपटे 1939 मध्ये हिंदू महासभेत सामील झाले. 22 जुलै 1944 रोजी पाचगणी येथे त्यांनी महात्मा गांधींच्या विरोधात निदर्शने केली. 1948 मध्ये त्यांनी कट रचून गांधींची हत्या केली.