Home वरोरा अत्यंत दुर्दैवी:- हेमंत उरकांडे या तरुण शेतकऱ्यांचा वीज कोसळून जागीच मृत्यु.

अत्यंत दुर्दैवी:- हेमंत उरकांडे या तरुण शेतकऱ्यांचा वीज कोसळून जागीच मृत्यु.

 

वरोरा तालुक्यातील कोटबाळा या गावातील घटना. गावात पसरली शोककळा.

वरोरा ता.प्र.किशोर डुकरे :-

आज वरोरा तालुक्यात झालेल्या मेघगर्जना पावसात तालुक्यातील कोटबाळा या गावातील तरुण शेतकरी हेमंत उरकांडे यांच्यावर अंदाजे दुपारी २.०० च्या दरम्यान वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला असल्याने गावात शोककळा पसरली आहे. गावातील एक उमदा तरुण शेतकरी यांचा असा दुर्दवी अंत व्हावा ही बाब मनाला चटके देणारी असून ऐन उमेदीच्या काळात पत्नी, आई आणि एका पंधरा वर्षाच्या मुलाला सोडून जाणे खूपच दुःखद आहे.

हेमंत भास्कर उरकांदे रा. कोटबाळा ता वरोरा वय 40 वर्ष हे शेतकरी शेतात काम करीत असताना अचानक त्यांच्यावर विज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, त्यांच्या पश्चात पत्नी शुभांगी वय 35 वर्ष, आई व मुलगा मानस वय 15 वर्ष आहेत. १० वर्षापूर्वी त्यांचे वडील मरण पावले होते आणि आता मुलावर काळाने डाव साधला असल्याने गावातील मंडळी शोकमग्न झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here