Home वरोरा कृषी वार्ता :- कृषी विद्यार्थ्याने शेतकऱ्यांना ई- पिक पाहणी बाबत दिले प्रशिक्षण.

कृषी वार्ता :- कृषी विद्यार्थ्याने शेतकऱ्यांना ई- पिक पाहणी बाबत दिले प्रशिक्षण.

 

शेतात प्रात्यक्षिक दाखवून स्मार्ट शेतकरी घडविण्याचा उपक्रम.

वरोरा प्रतिनिधी :-

राज्य सरकारने ई- पिक अपद्यावरे नोंदणी बंधनकारक केली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या संदर्भात विविध समस्यांना समोर जावे लागत आहे. हि बाब लक्षात घेता गौरव गजाननराव महल्ले याने वरोरा येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन ई- पिक पाहनीचे प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच पिक पेर्याची नोंदणी करून दिली. शिवाय आपल्या मोबाईल फोन वरून कृषी विभागाचे ॲप वापरून शेतकरी स्मार्ट होऊ शकतो याबद्दल त्यांनी जनजागृती केली.

शेतकऱ्यांनी हा ॲप कसा हाताळावा आणि त्यात माहाती कशी भरावी, पिकाचा फोटो घेताना लोकेशन चालू करावे, ई- पीक पाहणीचे भविष्यात फायदे काय? याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.. या माहिती कार्यक्रमाला विनोद गावंडे, अक्षय बुटे, अंकीत बोरकर, अण्णाजी ठाकरे व समस्त गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here