Home वरोरा मागणी :- नागपूर -चंद्रपूर मार्गे जाणाऱ्या सर्व बस गाड्यांना वरोरा आगारात थांबा...

मागणी :- नागपूर -चंद्रपूर मार्गे जाणाऱ्या सर्व बस गाड्यांना वरोरा आगारात थांबा द्या.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची डेपो व्यवस्थापक व विभागीय नियंत्रक यांच्याकडे मागणी.

वरोरा प्रतिनिधी :-

मागील अनेक वर्षापासून नागपूर चंद्रपूर व वणी नागपूर या मार्गावर चालणाऱ्या सर्व बस गाड्या उड्डाणपूल बनण्याच्या आधी पर्यंत वरोरा बस स्थानकात यायच्या, परंतु डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम चौक ते बस स्थानक यांच्या मधात असलेल्या रेल्वे गेट वर तयार झालेल्या उड्डाणपूलाच्या बांधकामानंतर नागपूर ते चंद्रपूर या मार्गावर चालणाऱ्या बसेस वरोरा बस स्थानकात न जाता डॉ. ए. पी. जे .अब्दुल कलाम चौक इथे थांबाविल्या जातात त्यामुळे वरोरा शहरातील नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नागपुर कडे जाणाऱ्या बसेस या चौकात येतात त्यावेळेस खासगी ट्रॅव्हल्स चालक मुजोरीने बसेस थांबवून ठेवतात .त्यामुळे महामंडळ बस चालकांना बस पुढे नेऊन उभ्या कराव्या लागतात त्यामुळे या बसची वाट पाहणारे प्रवासी धावत जात बस पकडतात अश्यातच एखादा छोटा मोठा अपघात होऊ शकतो. शिवाय या ठिकाणी प्रवाशांना बसण्याची चांगली व्यवस्था नाही पिण्याचे पाणी नाही त्यामुळे प्रवाशांना तासनतास उन्हात आणि पावसाळ्यात उभे राहावे लागत आहे.

वरोरा बसस्थानक येथे बस गाड्या कुणी बंद केल्या, त्या का बंद केल्या याचा लेखाजोखा बस स्थानक व्यवस्थापनाला नाही त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मुजजमील शेख यांच्या नेत्रूत्वात व मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या उपस्थितीत वरोरा बस स्थानक आगार प्रमुख यांच्याकडे निवेदन देऊन चंद्रपूर-नागपूर व वणी- चंद्रपूर या मार्गे जाणाऱ्या सर्व बस गाड्या यांचा वरोरा बस स्थानकांवर थांबा देण्यात यावा व प्रवाशांना दिलासा द्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखट्ट्याक आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला. यावेळी तालुका सचिव कल्पक ढोरे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी व इतर महाराष्ट्र सैनिक यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here