Home वरोरा अस्मानी सुल्तानी संकटांचा सामना करण्यासाठी शेतक-यांनी शेती सोबत जोडधंदा करावा, रवि शिंदे...

अस्मानी सुल्तानी संकटांचा सामना करण्यासाठी शेतक-यांनी शेती सोबत जोडधंदा करावा, रवि शिंदे यांचे प्रतिपादन.

 

श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टद्वारे वरोरा तालुक्यातील शेगाव येथे एक हात मदतीचा उपक्रम.

वरोरा (प्रतिनिधी) :-

यावर्षी सततच्या पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे सोयाबीन कापणीच्या तोंडावर असताना सोयाबीनचा भाव कमी करण्यात आला आहे. परीणामी या वर्षी शेतक-यांचे आर्थीक उत्पन्न घटले असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन केंव्हा आपल्या गळ्याला फास लटकवेल हे सांगता येत नाही मात्र आत्महत्या करणे हा पर्याय ठरू शकत नाही त्यामुळे शेतक-यांनी हिंमत सोडू नये. खचून जावू नये. दरवर्षी अशी अस्मानी संकटे शेतक-यांवर येत असतात. त्यामुळे पर्याय स्वरुपात शेतक-यांनी शेती सोबत जोडधंदा करावा, त्यासाठी जिल्हा बॅंक सुध्दा आपल्या सोबत राहील. भविष्यात शेतकरी बांधवांनी आर्थीक स्तर वाढविण्याकरीता शेती सोबत जोडधंदा करावा. आरोग्याकडे लक्ष दयावे, ग्रामीण भागात आजारांची साथ सुरु आहे. त्यामुळे स्वच्छता व शरीराची निगा राखावी, आदी विचार स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टद्वारे रवि शिंदे यांनी मांडले.

स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टद्वारे एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत वरोरा तालुक्यातील शेगाव येथे घेण्यात आला. कोरोनाने मृत झालेल्या पालकांच्या पाल्यांच्या व शेतकरी व गोर गरीबांच्या मुला-मुलींच्या पाल्यांच्या लग्नाचा खर्च ट्रस्टतर्फे करण्यात येइल, त्यासाठी १३ ऑक्टोबर पासून नोंदणी सुरु होणार आहे, अशीही माहिती शिंदे यांनी दिली.

वरोरा व भद्रावती तालुक्यातील प्रत्यक्ष गावागावात फिरुन शेतक-यांवर ओढवणा-या समस्यांना जाणून घेत आहोत व त्यांना बँकेतर्फे तथा स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट द्वारे जी मदत करण्यात येइल, ती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न ट्रस्टद्वारे रवि शिंदे करीत आहेत.
सदर कार्यक्रमाला सागर, पारडी, गिरोला, खेमजई, उमरी, चारगाव, पोहे, गुंजाळा, दाताळा, धानोली, महालगाव, आबमक्ता या गावातील नागरीकांचा सहभाग होता.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवि शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ताभाऊ बोरेकर, उपसरपंच साधनाताई मानकर, ग्रा.पं. सदस्य प्रफुल वाढई, मायाताई आत्राम, विनोद राउत, साखरकर, मारोती सोयाम, गजानन ठाकरे, बबलू माथनकर, रामू नाकाडे, अशोक साळवे, विनोद उजवलकर, सचिन मेश्राम व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here