शक्ती विधेयकामधे काय आहेत शिक्षा? जाणून घ्या तरतुदी.
मुंबई न्यूज नेटवर्क :-
राज्यातल्या महिलांवरील व मुलीवरील अत्याचाराविरोधात तातडीने कठोर शिक्षा करण्यासाठी तयार करण्यात आलेले शक्ती विधेयक काल विधानसभेत एकमताने मंजूर झाले. या विधेयकामुळे पीडित महिलांना व मुलींना खऱ्या अर्थाने नवी शक्ती मिळाली असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
राज्यातील महिला व अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचार लक्षात घेता गेल्यावर्षी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेक तज्ज्ञांचे मागर्दर्शन घेऊन शक्ती कायदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केला होता. यावेळी विधेयक दोन्ही सभागृहाच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त चिकित्सा समितीने अभ्यास करून नव्याने तयार केलेले शक्ती विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर झाले. विरोधकांकडूनही या शक्ती विधेयकाचे स्वागत करण्यात आले आहे. हे विधेयक आता मंजुरीसाठी विधानपरिषदेत मांडले जाणार आहे. दोन्ही सभागृहातील मंजुरीनंतर ते राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल.
या दरम्यान राज्यात महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा बसवा, यासाठी तयार करण्यात आलेल्या शक्ती विधेयक सुधारणा करण्यासाठी संयुक्ती समितीची स्थापना करण्यात आली होती. त्या समितीकडून अभ्यास आणि तज्ज्ञांचे मत जाणून घेत योग्य त्या सुधारणा करण्यात आल्या. विशेष म्हणजे या शिक्षेच्या कक्षेत पुरुषांबरोबरच महिला आणि तृतीयपंथी यांनाही आणले गेले आहे.