Home वरोरा ब्रेकिंग :- वरोरा शहरातील दत्त मंदिर वार्डात एका घराला भीषण आग.

ब्रेकिंग :- वरोरा शहरातील दत्त मंदिर वार्डात एका घराला भीषण आग.

 

उषाबाई गोणे या महिलेच्या घरातील अन्नधान्य यासह सर्व वस्तू जळल्या, मदतीची आर्त हाक.

वरोरा प्रतिनिधी :-

शहरातील घनदाट वस्तीत असलेल्या दत्त मंदिर वार्ड  मधील एका उषाबाई गोणे नामक महिलेच्या घराला शॉर्ट सर्किट मुळे भीषण आग लागल्याने त्यांच्या घरातील सर्व वस्तू जाळून खाक झाल्याने आता त्या महिलेवर मोठं संकट कोसळले आहे. दरम्यान वार्डातिल सामजिक कार्यकर्त्यानी त्या आगीवर नियंत्रण आणून आग वीझवली आहे व त्या महिलेला धीर दिला आहे पण तिच्या घरातील सर्वच वस्तू व धान्य जळून खाक झाल्याने तिच्या दोन वेळेच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था होणार कशी? या विवंचनेत ती महिला दुःखी झाली आहे.

ही भीषण आग अंदाजे आज रात्री 10 वाजता दिनांक 23 डिसेंबरला शॉर्ट सर्किट मुळे झाली असल्याची माहिती असून या आकस्मिक संकटात राजकीय सामाजिक संस्था  संघटनांनी त्या महिलेस मदत करावी अशी उपस्थित बघ्यांची चर्चा होती. परंतु चर्चा ऐवजी प्रत्यक्ष मदत त्या संकटात सापडलेल्या महिलेला करावी असे आवाहन भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल टीम ने केले आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अशोक भोयर विनोद कुंभारे, उमेश गेडाम, राहुल भोयर. नितेश भांडेरकर विक्की भोयर आदर्श भोयर. आकाश भोयर पवन एनंकेलवार इत्यादीं प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here