Home क्राईम स्टोरी धक्कादायक ;- ७४ वर्षीय म्हाताऱ्याने दोन अल्पवयीन मुलींवर केला अत्याचार.

धक्कादायक ;- ७४ वर्षीय म्हाताऱ्याने दोन अल्पवयीन मुलींवर केला अत्याचार.

 

म्हाताऱ्याच्या जीवे मारण्याच्या धमकीने मुलींनी नाही केली वाच्यता पण ….

चंद्रपूर न्यूज नेटवर्क – :

समाजात वयाचे भान नसलेल्या नराधमांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अल्पवयीन मुलीवर अत्याचारांच्या घटनां समाजमन सुन्न करणाऱ्या घडत आहे. अशीच एक धक्कादायक घटना नागभीड तालुक्यातील किरमिटी (मेंढा) येथे घडली असून एका ७४ वर्षीय म्हाताऱ्याने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी आरोपी पांडुरंग लवाजी बावणे (७४) याचावर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार पांडुरंग लवाजी बावणे या  म्हाताऱ्या आरोपीने गावाशेजारील बोरे वेचत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने जवळच असलेल्या एका घरात नेऊन अत्याचार केला व याबद्दल कुणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान हा प्रकार जिथे सुरू होता त्या घरात दुसरी एक अल्पवयीन मुलगी जेवण करीत होती. त्या मुलीवरही या म्हाताऱ्याने अत्याचार केला. आणि त्या अल्पवाहिन मुलीला पण जीवे मारण्याची धमकी दिली.

जीवे मारण्याच्या धमकीने त्या दोन्ही अल्पवयीन मुलींनी कुठेही घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले नाही. दोन-तीन दिवस अबोल स्वरूपात राहत होत्या. मुलीसोबत काहीतरी घडले असावे, असा संशय वडिलांना आला. मुलीची आई यावेळी बाहेरगावी गेली होती. मुलीच्या आईला गावी बोलावले असता मुलीने आईजवळ सर्व घटनाक्रम सांगितला. यानंतर मुलीच्या पालकांनी नागभीड पोलीस ठाण्यात यासंदर्भातील तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (१ए), ३७६ (एबी), ५०६ सहकलम ४, ६, १० बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आर. बी. मेढे, सपोनि पूनम पाटील करीत आहेत.

Previous articleमनसे वार्ता :- शिवडी विधानसभेचे मनसे कार्यालय जनतेच्या हक्काचे स्थान ठरणार.
Next articleब्रेकिंग :- वरोरा शहरातील दत्त मंदिर वार्डात एका घराला भीषण आग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here