Home मुंबई मनसे वार्ता :- शिवडी विधानसभेचे मनसे कार्यालय जनतेच्या हक्काचे स्थान ठरणार.

मनसे वार्ता :- शिवडी विधानसभेचे मनसे कार्यालय जनतेच्या हक्काचे स्थान ठरणार.

 

मनसे नेते बाळा नांदगावकर यांची नूतनीकरण झालेल्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिक्रिया.

मुंबई न्यूज वार्ता :-

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या सोबत अगदी सावली प्रमाणे सोबत करणारे मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या शिवडी विधानसभा क्षेत्रातील कार्यालयाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले व त्यानंतर या कार्यालयात सालाबादप्रमाणे श्रीसत्यनारायणाचे पूजन सुद्धा करण्यात आले. या नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन मनसे प्रमुख मा. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाले.

मनसे या पक्षाची कार्यालये हे जनतेसाठी हक्काचे स्थान असतात. पक्ष स्थापनेपासून या कार्यालयाद्वारे जनतेला वेळोवेळी मदत करण्याचाच प्रत्येकाचा हेतू असतो. राजसाहेबांनी दाखविलेल्या मार्गावर मार्गक्रमण करून जनतेला दिलासा देण्यासाठीच या कार्यालयाचा वापर निश्चित होईल अशी ग्वाही मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रात सध्याच्या संधीसाधू राजकारणात जनतेनेही जवळपास सर्वच पक्षांचा अनुभव घेतला आहे व आता त्यांना आपल्या मनसे कडून अनेक अपेक्षा आहेत. त्या द्रुष्टीने मनसेचे हे कार्यालय जनतेच्या समस्यांना सोडवण्यासाठी एक व्यासपीठ असेल अशी भावना त्यांनी व्यक्त केले व या कार्यक्रमसाठी विशेष मेहनत घेणाऱ्या शिवडी विधानसभा च्या सर्व मनसे पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

Previous articleस्तुत्य उपक्रम :- वरोरा शहरातील स्मशानभूमी व कब्रस्ताना स्वच्छता अभियानास सुरवात.
Next articleधक्कादायक ;- ७४ वर्षीय म्हाताऱ्याने दोन अल्पवयीन मुलींवर केला अत्याचार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here