Home वरोरा स्तुत्य उपक्रम :- वरोरा शहरातील स्मशानभूमी व कब्रस्ताना स्वच्छता अभियानास सुरवात.

स्तुत्य उपक्रम :- वरोरा शहरातील स्मशानभूमी व कब्रस्ताना स्वच्छता अभियानास सुरवात.

 

शहरातील सदभावना एकता मंच तर्फे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश.

वरोरा प्रतिनिधी :-
सदभावना एकता मंच व सदभावना युवा एकता च्या संयुक्त विद्यमाने दि. १९ डिसेंबर २०२१ पासून कब्रस्तान व स्मशानभूमी स्वच्छता अभियानाला सुरवात करण्यात आली आहे. रविवारी व सरकारी सुटीचे दिवशी सकाळी ८-०० ते २-०० पर्यंत स्वच्छता अभियान वरो-यातील वरोरा शहरातील सर्वच कब्रस्तान व स्मशानभूमितील वाढलेला कचरा साफ होईपर्यंत हे अभियान सुरु रहाणार आहे.

काल दिनांक १९ डिसेंबरला या अभियानाची सुरवात वणी नाका स्मशान भूमितून करण्यात आली . वणीनाका स्मशानभूमीसोबतच सलिमनगर कब्रस्तानातील कचरा साफ करण्यात आला . यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड उपस्थित होते दरम्यान सदभावना एकता मंचची संपूर्ण टीम या स्वच्छता अभियानात सहभागी झाली होती. वाढलेला कचरा,झाडं झुडपं मशिनद्वारे कटींग करुन त्याचे ढीग लावून कचरा जाळण्यात आला.

सदभावना एकता मंचचे नगरसेवक जैरुदीन.छोटूभाई शेख , गोपाळ गुडधे , इक्बाल भाई रंगरेज अरुण उमरे , सचिन मेश्राम , ओम चावरे , विजय आंबेकर , भारत तेला , सचिन राऊत यांनी संपूर्ण अभियानाचे नियोजन केले . या अभियानाच्या माध्यमातून सदभावना ऐकता मंच च्या संपूर्ण टीमने आपसी भाईचारा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला . सदभावना युवा एकता मंचचे गिरीष ढवस , प्रजय धोटे , राज गुडधे , आकाश नक्षिने , शुभम् वानखेडे , सुरज राऊत , विनोद काळसर्पे ,रुषी बोबडे , विनित बोबडे , प्रणय परचाके , लोकेश बोबडे , गणेश चिंचोलकर , सागर चिंचोलकर , अनिरुद्ध ठावरी , आयुष मडावी व उत्कर्ष मत्ते पूर्णवेळ उपस्थित राहून अभियानात सहभागी होते .

Previous articleनिवडणूक रनसंग्राम:- कोरपन्यात काँग्रेसला हरविण्यासाठी तीन माजी आमदार एकवटले
Next articleमनसे वार्ता :- शिवडी विधानसभेचे मनसे कार्यालय जनतेच्या हक्काचे स्थान ठरणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here