मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना केले आवाहन. आता होणार महाराष्ट्रात परिवर्तन?
लक्षवेधी :-
राजसाहेब ठाकरे यांनी संभाजी नगर येथील आपल्या भाषणात जातीवाद, शरद पवार आणि मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भाषण केलं. राजसाहेब ठाकरे यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा जातीवादाचा गंभीर आरोप केला. तर मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन बोलत असतानाच अजान सुरु झाली. त्यावेळी राजसाहेब ठाकरेंनी अधिक आक्रमक होत मशिदींवरील भोंगे हटवण्यावरुन सरकारला इशारा दिला. इतकंच नाही तर त्यांनी 4 तारखेपासून मशिदींवरील भोंग्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिले. महत्वाची बाब म्हणजे 2005 सालीही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेतही असाच प्रसंग घडला होता. तेव्हा बाळासाहेबांच्या एका वाक्यानं औरंगाबाद महापालिकेत युतीची सत्ता आली होती, असं सांगितलं जातं.
बाळासाहेबांच्या एका वाक्याने युतीची सत्ता ?
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाला नेहमीच गर्दी उसळत असते पण 2004 मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं सरकार असताना औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लागली. शिवसेना-भाजपच्या ताब्यात असलेली महापालिका खेचून आणण्यासाठी आघाडी सरकारने चांगलाच जोर लावला होता. तेव्हा 2005 साली याच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. त्यांचं भाषण ऐन रंगात असतानाच अचानक अजान सुरु झाली. तेव्हा बाळासाहेब काही क्षण शांत झाले. सभेला उपस्थित कार्यकर्तेही शांत झाले. त्यानंतर एक हात कमरेवर ठेवून, दुसरा हाताचं बोट उंचावून बाळासाहेब ठाकरे गरजले… याचसाठी मी विचारतोय, तुम्हाला औरंगाबाद हवं की संभाजीनगर? बाळासाहेबांच्या या प्रश्नानंतर उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. बाळासाहेब ठाकरे यांच्या या एका वाक्यामुळे औरंगाबाद महापालिकेतील युतीची सत्ता टिकली असंही बोललं जातं.
राजसाहेब ठाकरेंच्या सभेवेळीही अजान
बाळासाहेब ठाकरे व राजसाहेब ठाकरे यांच्यात खूप साम्य आहे व महाराष्ट्रात ज्या पद्धतीने राजसाहेब ठाकरे यांच्या सभा गाजत आहे त्या सभा बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच आहे कारण तेच मैदान, तोच प्रसंग आणि बाळसाहेब ठाकरे यांच्या काळात घडलेला किस्सा परत राजसाहेब ठाकरे यांच्या सभेच्या वेळी घडला असल्याने आता बाळासाहेबांचा खरा राजकीय वारस हे राजसाहेब ठाकरे असल्याचे चित्र आहे. कारण राजसाहेब ठाकरे भोंग्यावरून आक्रमकपणे बोलत असतानाच अजान सुरू झाली. त्यामुळे राजसाहेब ठाकरे थोडे थांबले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना अजान बंद करण्याची विनंती केली. आताच्या आता जाऊन तात्काळ अजान बंद करा. त्यांच्या तोंडात बोळा कोंबा. त्यांना सरळ भाषेत कळत नसेल तर काय ते होऊन जाऊ द्या. महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे हे दाखवून देऊ, असा इशारा राजसाहेब ठाकरे यांनी दिला.त्यांच्या या इशाऱ्यानंतरमहाराष्ट्राचं राजकीय वातावरण फिरलं असून एक मोठी राजकीय उथलपुथल होण्याची शक्यता वर्तवलीजात आहे.
भोंगे उतरवा…पण आधी मशिदींवरचे मग मंदिरांवरचे’
सभेच्या वेळी बांग देत असतील तर त्यांच्या तोंडात बोळा कोंबा. आताच्या जाऊन हे पहिल्यांदा बंद करा. त्यांना जर सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊन जाऊ देत. तुम्ही अजिबात शांत बसता कामा नये. संभाजी नगर पोलिसांना हात जोडून विनंती करतो. परत सांगतोय. ऐकत नसतील तर महाराष्ट्रातील मनगटात काय ताकद आहे हे दाखवू. देशवासियांना विनंती आहे की, मागचा पुढचा विचार करू नका. भोंगे उतरलेच पाहिजे. सर्व धर्मीयांच्या स्थळांवरचे भोंगे उतरलेच पाहिजे. पण आधी मशिदीवरचे नंतर मंदिरावरचे. अभी नही तो कभी नही. हवं तर पोलिसांची परवानगी घ्या. त्यांना परवानगी द्यावीच लागते. परवानगी घेऊन जोरात हनुमान चालिसाचं पठण कराल. हा सामाजिकदृष्टया प्रलंबित प्रश्न मार्गी लावा. हातभार लावाल. ही विनंती करतो, असं आवाहन राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना केलं.