Home वरोरा मनसेच्या वरोरा शहारात महाराष्ट्र दिनी निघालेल्या मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष.

मनसेच्या वरोरा शहारात महाराष्ट्र दिनी निघालेल्या मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष.

ढोल ताशे यांच्या तालावर थिरकले महाराष्ट्र सैनिक, गांधी चौकात समारोप सभेत विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश.

वरोरा प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या संभाजी नगर येथे होणाऱ्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशातील जनतेचे लक्ष लागले होते होते. इकडे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे महाराष्ट्र सैनिकांनी शहारात मिरवणूक काढून व ढोल ताशाच्या मराठी गाण्यावर ठेका धरून राजसाहेबांच्या सभेची उत्सुकता वाढवली. शहारातील माढेळी नाक्यांवरून निघालेली मिरवणूक चौकाचौकातून फिरून गांधी चौकात आली. दरम्यान या मिरवणुकीचे सभेत परिवर्तन करण्यात आले. गांधी चौकात झालेल्या या सभेत मनसे नेते रमेश राजूरकर. जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले

कोरोना योद्धा संजय रेड्डी यांचा सत्कार.

कोरोना काळात वरोरा शहर व तालुक्यातील रुग्णांना तात्काळ सेवा देणारे व गोरगरिबांना अन्न धान्य पुरवठा करून त्यांची भोजन व्यवस्था निर्माण करून देणारे संजय रेड्डी यांची वर्षभर स्वतःची अम्बुलन्स द्वारे मोफत रुग्णसेवा आहे त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल शासन प्रशासनाने व येथील सामाजिक संस्थांनी घेतली नसल्याने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मनसे नेते रमेश राजूरकर यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांनी या प्रसंगी मनसेत प्रवेश करून मनसेचा झेंडा हाती घेतला या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाटी शहर उपाध्यक्ष श्रीकांत तळवेकर. दिलीप उमाटे. कुलदिप निमकर. राजेंद्र धाबेकर श्रेयस कुमरे इत्यादींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here