Home वरोरा जय गुरुदेव स्वच्छ जल संस्थेच्या रोजगार मेळाव्याला मिळाला प्रचंड प्रतिसाद. विविध क्षेत्रातील...

जय गुरुदेव स्वच्छ जल संस्थेच्या रोजगार मेळाव्याला मिळाला प्रचंड प्रतिसाद. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्तीसहकारी बैंक चे संचालक  रवींद्र शिंदे यांनी घेतला स्थानिक लोकप्रतिनिधींचा समाचार.

वरोरा प्रतिनिधी :-

जय गुरुदेव स्वच्छ जल संस्था व संघर्ष इमारत बांधकाम कामगार संघटना बोर्डा यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार व स्वयंरोजगार तसेच कामगार मार्गदर्शन मेळाव्याचे भव्य आयोजन दि. १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून सिद्धिविनायक मंगल कार्यालय (पोलिस स्टेशन समोर) खांजी वॉर्ड वरोरा येथे सकाळी १०.०० वाजता करण्यात आले होते, या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून जवळपास ३ हजार युवक महिला यांनी सहभाग घेऊन मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या मेळाव्यात नोकरी करिता प्रशिक्षणाची निवड ,लघुउद्योग स्थापन करणे बाबत मार्गदर्शन.विविध प्रकारच्या उद्योगाबाबत माहिती व प्रोत्साहन, महिला बचत गटांना विविध रोजगाराच्या संधी बाबत मार्गदर्शन, शेतकण्यासाठी सामुहीक व सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन, शेतमाल व विविध उत्पादित वस्तू करिता बाजारपेठेची माहिती या सोबतच पाणी आडवा पाणी जिरवा या संदर्भात माहिती,जनतेला स्वच्छ पिण्याचे पाणी विषयी मार्गदर्शन. टाकावू पदार्थ, सांडपाणी, इत्यादीवर प्रक्रिया करून विषारी घटक मुक्त करून पाणी वापरण्यायोग्य करणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

मनसे नेते रमेश राजूरकर यांच्या जय गुरुदेव स्वच्छ जल संस्था, वरोरा व अनिल कुमरे यांच्या संघर्ष इमारत बांधकाम कामगार संघटना बोर्डाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे तर उद्घाटक म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक चे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रवींद्र शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते रमेश मेश्राम. शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे. कृषि उत्पन्न बाजार समिती चे संचालक दत्ता बोरीकर व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

रवींद्र शिंदे यांनी घेतला स्थानिक लोकप्रतिनिधींचा समाचार.

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कंपन्या असून देखील स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार मिळत नाही या कंपन्यांत परप्रांतीय लोक काम करत आहे पण जेंव्हा स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे बेरोजगार युवक कंपन्यांत नौकरी मिळावी म्हणून जातो तर त्यांच्या कडून कुठलीही शिफारस होत नाही उलट हेच लोकप्रतिनिधी कंपन्या कडून पैसे उकळण्याचे काम करतात.यांचे या क्षेत्रातील अवैध धंदेवाईक यांना पाठबळ आहे, रेती कोळसा इत्यादींची चोरी मोठ्या प्रमाणांत होत आहे मात्र स्थानिक प्रशासनातील सरकारी कर्मचारी व अधिकारी हे या लोकप्रतिनिधींचे नौकर असल्याप्रमाणे काम करतात त्यामुळे आता जनतेने यांचा डाव ओळखून यांना धडा शिकवावा व अन्यायाविरुद्ध पेटून उठावे मी आपल्या सोबत आहे त्यांना त्यांची जागा दाखवू असा इशारा पण त्यांनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here