बनावट दस्तावेज करणाऱ्या बांदूरकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार.
चंद्रपूर प्रतिनिधी :-
सुधाकर बांदूरकर यांनी बनावट सह्या मारून नोटरी पत्राद्वारे द्न्यानेश्वर जोगी यांची शेतजमीन हडपण्याचा प्रयत्न करून सतत पैशाची मागणी करत असल्याने त्यांचेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा अशी मागणी पिडीत शेतकरी द्न्यानेश्वर जोगी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत केली आहे. या संदर्भात श्रमिक पत्रकार परिषदेत आपली कैफियत मांडताना शेतकरी शेतकरी जोगी हे गहिवरुन गेले होते.
हकिगत अशी आहे की मौजा अन्तुर्ला त. सा. क्रमांक -4 भूमापन क्रमांक -45 आराजी 0.91 हे. आर ही शेतजमीन ज्ञ!नेश्वर जोगी यांची असून दिनांक 25/03/2022 ला सुधाकर बांदुरकर यांनी त्याचे सोबत कुठलाही आर्थिक व्यवहार झाला नसताना खोट्या व बनावट सह्या घेऊन नोटरी दस्त तयार केले व त्याचे कडून 4 लाख रुपये घेतल्याचे व 2 लाख रुपये रजिस्ट्री करण्याच्या वेळी देणार असे बनावट नोटरी दस्तामधे नमूद करण्यात आले. खरं तर नोटरी दस्तावेजात शेतकरी यांनी कुठलीही सही केली नाही एवढेच नव्हे तर त्यांनी कुठलाही आर्थिक व्यवहार केला नाही त्यामुळं ही एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक आहे आणि शेतकरी जोगी यांना त्या बनावट नोटरी दस्तांचा धाक दाखवून 4 लाख रुपयांची मागणी सुधाकर बांदूरकर करत आहे. पण ज्याअर्थी शेतजमीन मालक यांच्यासोबत सुधाकर बांदूरकर यांचा कुठलाही आर्थिक व्यवहार झाला नाही त्याअर्थी सुधाकर बांदूरकर यांना पैसे कशाचे द्यायचे? म्हणून शेतकरी ज्ञनेश्वर यांनी उमेश देशपांडे या वकिलामार्फ़त त्यांनी राजेश जुनारकर या वकिलाकडून पाठवलेल्या नोटीस ला उत्तर दिले व कायदेशीर कारवाई करण्याची सुधाकर बांदूरकर यांना तंबी दिली जेणेकरून तो त्यांना पैशाची मागणी करणार नाही पण तो आता केवळ 20000 रुपये तरी द्या अन्यथा मी तुम्हच्या विरोधात पोलिसात तक्रार देऊन तुला अटक करायला लावीन अशी धमकी देत असल्याने शेतकरी ज्ञ!नेश्वर जोगी यांनी काल जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार देऊन पत्रकार परिषद घेतली व सुधाकर बांदुरकर यांच्यावर फ़सवनुकिचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रसंगी शेतकरी ञ्जआनेश्वर जोगी यांच्यासोबत मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे मनसे जनहित विधी कक्ष विभाग जिल्हा सचिव गुरुदेव मोगरे व सुनील चिलबिलवार उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडताना म्हटले आहे की सुधाकर बांदुरकर यांचे भाचे गोलु बाबाराव मुसळे यांच्याकडून मी 10 महिन्यांपूर्वी 2,00000 रुपये व्याजाने घेतले होते व 9 महिन्यांनंतर 1 लाख व्याजासह मी त्याचे 3 लाख रुपये परत केले पण त्या पैशाचा संदर्भ घेऊन बांदुरकर हे मला बनावट नोटरी व माझ्या खोट्या सह्याचा कागद दाखवून माझ्याकडून बळजबरीने चार लाखांची व आता 20 हजारांची मागणी करत असल्याने त्याचे पासून माझ्या जिवाला धोका आहे त्यामुळे त्यांचेवर गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.