Home वरोरा धक्कादायक :- हनुमान मंदिरावर वीज पडून मंदिराचा कळस कोसळला.

धक्कादायक :- हनुमान मंदिरावर वीज पडून मंदिराचा कळस कोसळला.

वरोरा तालुक्यातील कोटबाळा येथील घटना. हनुमानभक्त बांधणार नवे मंदिर ?

वरोरा प्रतिनिधी :-

असं म्हटल्या जातं की निसर्गाचा प्रकोप हा कुणालाही माफ करत नाही मग साक्षात ब्रम्हदेव असेल तरी. असाच एक धक्कादायक प्रकार काल वरोरा तालुक्यातील कोटबाळा या गावात घडला असून हनुमान मंदिरावर पडलेल्या विजेच्या झटक्याने मंदिराचा कळस कोसळला असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जातं आहे. काल वरोरा तालुक्यात रात्रीला सुसाट वाऱ्यासह विजेचा कडकडाटासह जोरात पाऊस आला व एक वीज हनुमान मंदिरावर एवढी भयंकर पडली की त्या विजेच्या झटक्याने मंदिराचा कळस तुटून खाली पडला दरम्यान परिसरातील वीज गेल्याने अंधारात गावकऱ्यांना मंदिराचे नेमके काय नुकसान झाले याचा सुगावा लागला नाही मात्र सकाळी पहाटे गावकऱ्यांनी पाहणी केली असता मंदिराचा कळस कोसळल्याचे दिसले.

हनुमान मंदिराचा कळस कोसळल्याने व मंदिराला भेगा पडल्याने ते मंदिर भग्न झाले जे गावासाठी एक प्रकारचे शुभ संकेत नाही त्यामुळे गावकऱ्यांनी आता नवीन मंदिर बांधण्यासाठी कंबर कसली असून यासाठी गावकरी एक बैठक घेऊन मंदिर बांधणी करण्याचा विचार करणार आहे. मात्र भग्न झालेल्या मंदिरात गावकरी पूजा नक्की करेल व पुन्हा नवीन मंदिर बांधण्याचा संकल्प करेल असे गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी बोलून दाखवले आहे.

Previous articleमाझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारून एकत्र या.
Next articleअत्यंत गंभीर :- ज्ञ!नेश्वर जोगी या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे सुधाकर बांदूरकर यांनी केले बनावट इसारपत्र ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here