Home वरोरा मनसे वार्ता ;- वरोरा तालुक्यात मनसेच्या मोवाडा व पिंपळगाव येथे शाखा फलकांचे...

मनसे वार्ता ;- वरोरा तालुक्यात मनसेच्या मोवाडा व पिंपळगाव येथे शाखा फलकांचे थाटात उद्घाटन.

मनसेचे स्थानिक नेते रमेश राजूरकरयांच्या नेत्रुत्वात वरोरातालुका होणार मनसेम. हजारो तरुण मनसेत.

वरोरा प्रतिनिधी :-

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या देशात मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची हवा असताना व जिकडे तिकडे पक्षाचे कार्यकर्ते आंदोलनाच्या भूमिकेत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात मनसे पदाधिकारी यांनी पोलीस प्रशासनाला शहरातील मस्जिदीवरचे भोंगे काढण्यासाठी अल्टिमेट देऊन काही वेळ दिली आहे. दरम्यान मनसेचे गाव तिथे व वार्ड तिथे शाखा या निश्चयाने गावागावात व शहरातील संपूर्ण वार्डात शाखा निर्माण करण्याचा सपाटा लावला आहे. आज दिनांक 7 मे ला सायंकाळी तालुक्यातील मोवाडा व पिंपळगाव इथे मनसे नेते रमेश राजूरकर यांच्या प्रमुख उपथितित शाखा फलकांचे उद्घाटन करण्यात आले. मनसेचे स्थानिक नेते रमेश राजूरकर यांच्या नेत्रुत्वात वरोरा तालुका मनसेमय होणार असून आतापर्यंत हजारो तरुण मनसे पक्षात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात मनसे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या व नगरपरिषद च्या संभावित निवडणुका लक्षात घेता मोठ्या प्रमाणात मनसे उमेदवार निवडून यावे यासाठी संघटन बांधणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात सुरू असून तालुक्यातील सर्व गावात पक्षाच्या शाखा येणाऱ्या काही दिवसात दिसणार आहे. त्याचाच भाग म्हणून तालुक्यातील मोवाडा व पिंपळगाव येथे शाखा फलकांचे उद्घाटन मनसे नेते रमेश राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शाखा उद्घाटन प्रसंगी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे,जिल्हा सचिव विनोद सोनटक्के. तालुका उपाध्यक्ष विनोद खडसंग. शहर उपाध्यक्ष श्रीकांत तळवेकर. विभाग अध्यक्ष राजेंद्र धाबेकर तालुका प्रशिद्धि प्रमुख बिल्ला उर्फ श्रेयस कुमरे इत्यादींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here