Home वरोरा खळबळजनक :- सहाय्यक पोलीस अधिक्षक नोपानी यांच्या मध्यरात्री वाळू तस्करावर केलेल्या मोठ्या...

खळबळजनक :- सहाय्यक पोलीस अधिक्षक नोपानी यांच्या मध्यरात्री वाळू तस्करावर केलेल्या मोठ्या कारवाईने खळबळ.

उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्या छुपा पाठिंब्याने सोइट रेती घाटावर कोट्यावधी रुपयांची रेती चोरी ?

वरोरा प्रतिनिधी :

वरोरा येथील अवैध धंदेवाईक यांचा कर्दनकाळ असणारे सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांच्या प्रस्थापित रेती माफियांवर धाडसी कारवाईने अगोदरच वरोरा भद्रावती क्षेत्रात रेती तस्कर दहशतीत होते दरम्यान त्यांचे लग्न व नंतर त्यांचा ट्रेनिंग पिरियड असल्याने ते चार महिने सुट्टीवर असताना या क्षेत्रात जणू अवैध धंद्यांना उधाण आले होते. त्यातच रेती माफिया पुन्हा सक्रिय होऊन खुलेआम रेती घाटांवर बेकायदेशीर रेती उत्खनन करून रेती चोरी करत होते. विशेष म्हणजे या क्षेत्रातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मंडळ अधिकारी यांचा या रेती माफियांना छुपा पाठिंबा आहे की काय ? अशी परिस्थिती दिसत असताना नुकताच ट्रेनिंग पिरियड संपवून आलेले सहाय्यक पोलीस अधीक्षक नोपानी यांनी दिनांक ०७/०५/२०२२ रोजी रात्री ९.०० वाजता सोईट येथील वर्धा नदी घाटावर छापा टाकून रेती व गौण खनिजांचे अवैध उत्खनन करणारे ६ हायवा ट्रक, २ टीप्पर ट्रक व २ पोकल्यान मशीन सह रेती साठा असा एकूण २,६०,८००००/- दोन कोटी साठ लाख ऐंशी हजार रुपयांचा ऐवज जप्त केल्याने व ट्रक मालक चालक पोकल्यान ऑपरेटर व घाटावर उपस्थित दिवांजी सह एकूण १७ जणांवर वरोरा पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी नोपानी यांचे अधिनस्त पोलीस कर्मचारी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तरवार व पोलीस कर्मचारी यांनी रात्री २१.०० वा सुमारास मौजा सोइट येथील वर्धा नदी रेती घाटावर छापा टाकला व ट्रक चालक मालक व पोकल्यान ऑपरेटर यांच्यासह एकूण १७ जणांवर गुन्हा क. २७५/२०२२ ३७९,३४. मा.दं.वि गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी रेती उपसा करण्याचा मनाई निर्देश जिल्हाधिकारी चंद्रपुर यांचा असताना अवैध रेती उत्खनन होते कसे व कुणाच्या आशीर्वादाने होते ? हा गंभीर प्रश्न असून नोपानी यांनी रात्रीला रेती घाटावर केलेल्या कारवाईने रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.

ट्रक चालक पोकलैन मशीन ऑपरेटर व दिवांजी ताब्यात तर मालक फरार ?

राजकीय वरदहस्त असणाऱ्या काहींचे हायवा, ट्रक टीप्पर चालक व पोकलैन मशीन ऑपरेटर हे रेती भरताना पोलिसांच्या कारवाईत पकडल्या गेले तर सहाय्यक पोलीस अधीक्षक नोपानी यांच्या कारवाईच्या भीतीने मालक मात्र फरार असल्याची माहिती असून अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी ते जिल्हा सत्र न्यायालयात वकिलांकडून प्रयत्न मरणार असल्याचे दिसते मात्र नोपानी यांच्या या धाडशी कारवाईने सर्वसामान्य जनता खुश असल्याची चर्चा आहे.

महसूल विभाग अनभिज्ञ की रेती माफियांच्या बाजूने ?

कुठल्याही अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा पहिला अधिकार व कर्तव्य हे महसूल विभागाच्या उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांचे आहे मात्र तेच जणू माकडांच्या तीन बंदराचे सोंग घेऊन गप्प असल्याने रेती तस्करी असणाऱ्यांचे मनसुबे बुलंद झाले होते. जणू अवैध उत्खनन करण्याची खुली सूट या महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी अवैध गौण खनिज व रेती उत्खनन करणाऱ्यांना दिली होती. त्यामुळे सरकारचा महसूल कोण वाचविणार ?असा प्रश्न वरोरा भद्रावती क्षेत्रात निर्माण झाला होता. अशातच काही महिन्याअगोदर सहाय्यक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रुजू झालेले नोपानी यांनी अशा अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा सपाटा सुरू केला पण यामध्ये महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी आहेत तरी कुठे ? महसूल विभाग अनभिज्ञ की रेती माफियांच्या बाजूने आहेत ? असे प्रश्न आता सामान्य नागरिक विचारू लागला आहे.

रेती घाट परिसरातील व इतर ठिकाणचे अवैध रेती साठे पोलिसांच्या रडारवर ?

अवैध रेतीची साठवणूक करणारे हे रात्रीच्या वेळीच रेती साठवणूक करत असतात व आजही रेतीचे साठे नदी घाटांवर व इतरत्र ठिकाणी साठवून ठेवले आहे त्याचा शोध पोलीस घेणार असून ते अवैध रेती साठे पोलिसांच्या रडारवर असल्याची गोपनीय माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here