Home वरोरा खळबळजनक :- शिवसेना जिल्हा चिटणीस मनीष जेठानी व राष्ट्रवादी चे सरपंच निब्रड...

खळबळजनक :- शिवसेना जिल्हा चिटणीस मनीष जेठानी व राष्ट्रवादी चे सरपंच निब्रड यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार.

विएस इस्पाविरोधात गावकऱ्यांना भडकावून आंदोलन करणाऱ्या व त्या बदल्यातकंत्राट व पैशाची मागणी करणाऱ्या मनीष जेठानीसह सरपंच हर्शल निब्रड यांच्यावर कारवाई करण्याची कंपनी एच आर मनीष कातंगले यांची मागणी

वरोरा प्रतिनिधी :-

विएस इस्पाविरोधात मौजा सालोरी (येसा ब्लॉक) येथील गावकऱ्याकडून मनीष जेठानी यांच्या नेतृत्वात नेहमी होणारे आंदोलन आणि दि. १०/०५/२०२२ ला होणारे आंदोलन न होण्याकरिता त्याबदल्यात पैशाची व कामाचे कंत्राट मिळविण्यासाठी मागणी केल्याबाबत शिवसेना जिल्हा चिटणीस मनीष जेठानी सह गावाचे सरपंच हर्शल निब्रड यांची चौकशी करून कारवाई करावी अशा प्रकारची तक्रार वरोरा पोलीस स्टेशन येथे कंपनीचे एचआर मनीष कातंगले यांनी केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सालोरी येन्सा ब्लॉक (छोटा मजरा) या ग्रामपंचायत चे सरपंच हर्शल निब्रड यांच्या सोबत भ्रमणध्वनीद्वारे झालेल्या संभाषणाची ऑडियो क्लिप व्हायरल झाल्याने आता या घटनेसंदर्भात पोलीस नेमकी काय कारवाई करणार ? याकडे राजकीय क्षेत्रातील मंडळींचे लक्ष लागलेले आहे.

कंपनीचे एचआर मनीष कातंगले यांनी वरोरा पोलीस स्टेशन येथे दाखल केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की याआधी कंपनी विरोधात मनीष जेठानी यांच्या (दि.४/४/२००२ आणि १४ व १५ एप्रिल २०२२) काम व रस्ता बंद आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन मागे घेण्यासाठी व गावकऱ्यांना म्यानेज करण्यासाठी मनीष जेठानी यांनी मला वैयक्तिक रित्या लेबर कंत्राट मिळवून देण्यासाठी मागणी केली होती. तसेच गावकर्याच्या मागण्या मान्य न झाल्यास कंपनी बंद करण्याची धमकी वजा इशारा देण्यात आलेला होता.

तक्रारीत ते पुढे म्हणाले की सदर आंदोलनाच्या १०/५/ २०२२) एकदिवस आधी म्हणजे ९/१/२०२२ ला हर्शल निब्रड (ग्रामपंचायत सालोरी मला माझ्या मोबाईलवर ८६६९८७७७८७ या मोबाईल क्रमांकावरून रात्री जवळपास ८.३० वाजता फोन आला व त्याच्याजवळपास १५ ते २० मिनिटे संभाषण झाले. या फोनवर झालेल्या संभाषणात हर्षद सदर आंदोलन यांबविण्यासाठी तसेच गावकर्याना म्यानेज करण्यासाठी कंपनीमध्ये कॅन्टीनचा व (Water tankar) याचे कंत्राट तसेच पैसे देण्याची मागणी केली. जर हि मागणी पूर्ण न झाल्यास कंपनी कायमस्वरूपी बंद करण्याची व कंपनीत तोडफोड करण्याची व प्रकरण वाढविण्याची धमकी देण्यात आली. या संदर्भात हर्षल यांच्या सोबत फोनवर झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग क्लिप माझ्याकडे आहे. तसेच या विषया संदर्भात मनीष जेठानी, धनराज वांढरे, सुभाष लाडोदिया, गवश्या घोबाडे, संजय सुखदेवे, महेंद्र आला दिलीप यांची साखळी सुदा असल्याची दिसून येते. या अनुषंगाने आपणास विनंती आहे की, हर्शल निब्रड (सदस्य ग्रा. पं सरपंच सालोरी येन्सा ब्लॉक) व मनीष जेठानी याची पोलीस प्रशासनामार्फत चौकशी करण्यात यावी हि विनंती.

बीएस इस्पात कंपनी मधे स्थानिक कामगारांना घेण्यासाठी शिवसेना जिल्हा चिटणीस मनीष जेठानी व राष्ट्रवादी पक्षाचे सरपंच हर्शल निब्रड यांनी गावकऱ्यांना घेऊन कंपनी विरोधात आंदोलन उभारले खरे पण ते आंदोलन स्थानिक भूमिपुत्रांना त्या कंपनीत रोजगार मिळवून देण्यासाठी नव्हे तर त्याच्या आडोशाने पैसे कमावण्याचा यांचा उद्देश होता असा एकूण कार्यक्रम कंपनी विरोधात दिसत आहे. जर ही खरी बाब असेल तर राजकीय नेत्यांवर कुणाचाही विश्वास राहणार नाही.त्यामुळे या संदर्भात पोलिसांनी योग्य तो तपास करावा व कंपनी व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक मनीष जेठानी किंव्हा सरपंच हर्शल निब्रड यांसह इतर कामगारांना पोलिसांच्या चौकशीत अटकवून आपलं चांगभलं करण्याचा कंपनीचा डाव असेल तर तो सुद्धा उधळून लावावा, कारण स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे पण त्यांच्या आडोशाने जर कुणी वयक्तिक लाभ घेत असेल तर गावकऱ्यांनी सुद्धा सजग राहावे अशी मागणी या परिसरातील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here