मनसे महिला सेना जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड यांचा चंद्रपूर शहरात पुढाकार तर बल्लारपूर येथे तालुका अध्यक्षा कल्पनाताई पोर्तलावारयांचा पुढाकार.
चंद्रपूर प्रतिनिधी :-
दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे शहारातील कर्तव्यावर असलेल्या सर्व पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन चा सोहळा साजरा करण्यात येतो. यावर्षी सुद्धा महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड यांच्या पुढाकाराने चंद्रपूर शहरातील मनसे महिला सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या यांच्या माध्यमातून शहारातील शहर पोलीस स्टेशन रामनगर पोलीस स्टेशन व ट्रॅफिक पोलीस प्रशासनाच्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी मनसे महिला सेना जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष शोभा वाघमारे,माजी नगरसेविका सीमा रामेडवार, जिल्हासचिव अर्चना आमटे,शहर उपाध्यक्ष प्रीती रामटेके,शहर उपाध्यक्ष विमल लांडगे,विभाग अध्यक्ष वर्षा भोमले,बल्लारपूर शहर अध्यक्ष मंगला घडले, शाखा अध्यक्ष शमीम खान, मंगला चांदेकर,शहर संघटक मनोज तांबेकर, राज वर्मा,राहुल भटवलकर इत्यादींची उपस्थिती होती.
बल्लारपूर येथे सुद्धा मनसे महिलां सेनेचा रक्षाबंधन सोहळा
समाजकार्यात अग्रेसर असनार्या महाराष्ट्र नवनिर्मान महिला सेनेच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षा कल्पनाताई पोर्तलावार यांच्या नेतृत्वात दरवर्षी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेतला जातो यावर्षी सुद्धा मनसेच्या महिला पदाधिकार्यांनी पोलीस स्टेशन बल्लापूर येथील पोलीस बांधवाना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला पोलीस बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र आपले कर्तव्य बजाऊन आम्हची रक्षा करतात कोरोना काळात देखील पोलीस बांधवानी नागरीकांची सेवा केली अशीच सेवा आपल्या हातून घळत राहावी व महिलांचे रक्षण करावे यासाठी पोलीस बांधवाना रक्षाबंधन या पवित्र सनाचे औचित्य साधून मनसे महिलासेना बल्लारपूर च्या पदाधिकार्यांनी पोलीस बांधवाना राखी बांधून शहराच्या रक्षणाचे वचन घेतले यावेळेस बल्लारपूर मनसे महिलासेना तालूका अध्यक्षा सौ. कल्पनाताई पोर्तलावार तालुका उपाध्यक्ष शालिनी मेश्राम तालुका सचिव गौराक्का दासरापु रेखा टिपले दिव्या दासरापू गुबूडे शिल्पा रेखा मरासकोले आदि मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते