Home वरोरा स्वातंत्र्याची 75 वर्ष आणि वरोरा तालुक्यातील सालोरी गाव अंधारात असतं ?

स्वातंत्र्याची 75 वर्ष आणि वरोरा तालुक्यातील सालोरी गाव अंधारात असतं ?

गावातील मनसे युवा कार्यकर्त्यांच्या आक्रमक पावित्र्यामुळे गावात झाला अंधार् दूर. गांवकरी आनंदले.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील सालोंरी गावात मागील दोन महिन्यांपासून अंधार असून सरपंच उपसरपंच सदस्य व सचिव हे साखर झोपेत आहेत कां ?असा प्रश्न ग्रामस्थांना पडला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा पदाधिकाऱ्यांनी या विरोधात आवाज उठवून संवर्ग विकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांना वेळोवेळी निवेदने देऊन गावातील स्ट्रीट लाईट सुरू करण्याची मागणी केली, परंतु निगरगट्ट प्रशासन व झोपलेले लोकप्रतिनिधी यामुळे स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत असताना व 15 ऑगस्ट ला सगळीकडे रोषणाई करण्याचे व हा दिवस मोठ्या उत्सवात साजरा करण्याचे केंद्र सरकारचे आदेश असताना चक्क सालोरी गावातच अंधार् असेल तर रोषणाई कशी काय करणार ? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता मात्र सालोरी गावातील मनसे शाखा पदाधिकारी व गावातील युवकांचा आक्रमक पवित्रा बघता येणाऱ्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोहळ्यात ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व इयर सदस्यांना घेरण्याचा प्रयत्न होणार होता त्यामुळे शासनाच्या आदेशाप्रमाणे अखेर सालोरी गावाची स्ट्रीट लाईट सुरू करण्यात आली.

ग्रामपंचायत च्या खजान्यात फक्त 1600 रुपये ?

जवळपास तीन हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सालोरी गावच्या ग्रामपंचायत मधे केवळ घराचा कर वर्षाकाठी 15-20 लाखांच्या जवळपास असतांना व ग्रामपंचायत ला विविध निधी उपलब्ध असताना ग्रामपंचायत गावातील स्ट्रीट लाईट चे वीज भरायला ग्रामपंचायत जवळ पैसे नाहीत म्हणजे येथील सरपंच उपसरपंच यांना जनतेने निवडून कशासाठी दिले ? गावात अंधार करायला? आणि गाव अंधारात असताना जाणीवपूर्वक वीज बिल भरणार नसल्याच्या वल्गना करायला ? आश्चर्याची बाब म्हणजे ग्रामपंचायत च्या बैंक खात्यात केवळ 1600 रुपये जमा असल्याचे सचिवांकडून सांगण्यात येत आहे म्हणजे यांनी ग्रामपंचायत ला एवढी कंगाल करून ठेवली की वीज भरायला सुद्धा यांच्याकडे पैसे नाहीत.

*सरपंच उपसरपंच कशासाठी ?

गावातील नागरिकांना भौतिक सोई सुविधा मिळवून देण्यासाठी व गावाचा विकास करण्यासाठी सरपंच उपसरपंच व सदस्यांची निवडणुकीत मतदानातून नियुक्ती ग्रामस्थ करतात पण हेच सरपंच उपसरपंच व सदस्य गावातील जनतेला अंधारात ठेवत असेल तर मग यांना निवडून देऊन फायदा तो काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सालोरी-खातोडा -वलनी गटग्रामपंचायत च्या कारभाराचा हिशोब होणार?

सालोरी ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आला असून ज्याअर्थीस्ट्रीट लाईट चे बिल भरण्यासाठीयांच्याकडे पैसे नाहीत तर बाकी विकासकामेही ग्रामपंचायत कशी काय करणार?हा मोठा प्रश्न असून याच ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या  खातोडा वलनी ही गावे सुद्धा अशीच विकासापासूनदूर आहेत जिथे आदिवासी लोक मोठ्या संखेने राहतात त्यांना शासनाच्या विशेष योजना लागू असतात पण सरपंच उपसरपंच हे केवळ कमिशन खोरी करतात व आदिवासी च्या योजना त्यांच्या पर्यंत पोहचवत नाही पर्यायाने त्या योजनांचा निधी परत जातो व बिचाऱ्या आदिवासीच्या हातात काहीही लागत नाही. त्यामुळे आता मनसे पदाधिकाऱ्यांनी माहितीचा अधिकार अंतर्गत ग्रामपंचायत ने खर्च केलेल्या निधीचा हिशोब मागितला असल्याने सत्ताधारी कचाट्यात येऊन त्यांच्यावर मोठी कारवाई होऊ शकते.

Previous articleपोलीस बांधवाना राखी बांधून मनसे महिला सेनेने साजरा केला रक्षाबंधन सोहळा.
Next articleसंतापजनक:- प्रहार संघटनेच्या आंदोलनाला जी.एम. आर कंपनीचा ठेंगा ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here