Home वरोरा संतापजनक:- प्रहार संघटनेच्या आंदोलनाला जी.एम. आर कंपनीचा ठेंगा ?

संतापजनक:- प्रहार संघटनेच्या आंदोलनाला जी.एम. आर कंपनीचा ठेंगा ?

जागा निघाल्यास विचार करू असे आश्वासन देऊन प्रहार च्या आंदोलनाची केली बोळवण ?

वरोरा प्रतिनिधी :-

महाराष्ट्रात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चु कडू यांच्या आंदोलनाची दखल शासन प्रशासन घेतात हा आजवरचा इतिहास राहिला आहे पण वरोरा तालुका अध्यक्ष किशोर डुकरे यांनी स्थानिक बेरोजगार साठी प्रहार संघटनेमार्फत दोन वेळा लोटांगण व मूक आंदोलन केले मात्र जी एम आर कंपनी च्या मुजर प्रशासनाने स्थानिक बेरोजगार युवकांना कुठल्याही प्रकारचे लेखी आश्वासन देण्यात आले नाहीत याबाबत प्रहार तालुका अध्यक्ष किशोर डुकरे यांनी माजी कामगार मंत्री बच्चू कडू यांच्या कानावर ही बाब टाकून स्थानिक लोकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली होती, त्या मागणीच्या अनुषंगाने माजी कामगार मंत्री बच्चू कडू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात कारवाईचे आदेश दिले होते मात्र संबंधित अधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही, त्यामुळे दिनांक 12 ऑगस्ट ला पुन्हा आंदोलन करण्यात आले पण तरीही प्रहार च्या आंदोलनाला ठेंगा दाखवून केवळ जागा निघाल्यास आम्ही तुम्हचे लोक घेऊ असे आश्वासन दिल्याने प्रहार च्या आंदोलनाला जी.एम.आर कंपनीने बेदखल केले असल्याची गंभीर बाब समोर येत आहे.

जी.एम.आर कंपनीनच्या या तटस्थ भूमिकेचा प्रहार कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करून येणाऱ्या काळात आता प्रहार संघटना तीव्र आंदोलन करेल व जीएमआरच्या मुजोर प्रशासनाला हलवून परप्रांतीय यांना जसे घेतले तसेच बाहेर काढून स्थानिकांना रोजगार द्या ही मागणी घेऊन प्रहार संघटना वरोरा मार्फत येणाऱ्या पंधरा दिवसात तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here