कर्करोगासह इतर आजारांना निमंत्रण देणाऱ्या या व्यवसायात महिन्याकाठी कोट्यावधीची उलाढाल.
लक्षवेधी भाग -2
जिल्ह्यात अवैध व्यवसायांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून त्यात नकली सुगंधीत तंबाखू व पानमसाला सर्हासपने विकल्या जातं असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी व पोलीस प्रशासन नेमकं काय करताहेत हेच कळायला मार्ग नसून ज्या तंबाखू मधील निकोटीन नावाच्या विषामुळे हजारो लोकांना कर्करोग झाला त्या तंबाखूवर बंदी असताना त्या सुगंधीत तंबाखूची विक्री होते कशी ? यामागे कोण आहेत ? याचा शोध घेतला तर चक्क रक्षकच भक्षक असल्याचं विदारक चित्र समोर येत आहे. अन्न औषधी प्रशासनाकडे ही महत्वपूर्ण जबाबदारी आहे की सुगंधीत तंबाखू ची बेकायदेशीर विक्री होता कामा नये पण चक्क अन्न औषधी प्रशासनातले अधिकारी यांना बेकायदेशीर सुगंधीत नकली तंबाखू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून लाखों रुपयांचा हप्ता जातो त्याचे अनेक पुरावे समोर आले आहे. म्हणजे तंबाखू वर बंदी असताना तो खुलेआम विकला जातो तो याच अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने विकला जातो हे शिद्ध होते.
अन्न औषधी प्रशासनातील अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल करण्याची गरज ?
अन्न औषधी प्रशासन विभाग म्हणजे केवळ कागदोपत्री कामे करणारे कार्यालय, इथे अधिकारी कर्मचारी कमी आहेत म्हणून जिल्ह्य़ातील कामाचा बोझा सुद्धा जास्त असल्याच्या वल्गना येथील अधिकारी करतात परंतु हे सत्य नाही कारणं या विभागाच्या अधिकाऱ्यांना माहीत आहे की अमली पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थ कुठे विकल्या जाते व ते कोण विकतात ? कारणं कुठलाही अवैध धंदेवाईक हा पोलीस प्रशासन व संबंधीत विभाग यांच्या संमती शिवाय कुठलाही अवैध व्यवसाय करू शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि म्हणूनच अवैध सुगंधित तंबाखू विकणाऱ्या व्यापाऱ्यांसोबत या विभागाच्या अधिकाऱ्यांशी संबंध आहेत. अवैध नकली सुगंधीत तंबाखू च्या बेकायदेशीर विक्रीमुळे कर्करोग मोठ्या प्रमाणांत वाढत आहे त्यामुळे जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या अन्न औषधी प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हायला हवे अशी सर्वत्र मागणी होत आहे. कारणं एकीकडे सणासुदीला ड्रायफ्रूट व इतर पेकिंग पदार्थांच्या विक्रीच्या मालाची चेकिंग करायला यांच्याकडे वेळ आहे तर मग अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सुगंधीत तंबाखू व इतर पानमसाला पदार्थांच्या अवैध विक्री संदर्भात यांना कां वेळ मिळत नाही ?हा खरा प्रश्न आहे
कोण करतोय होलसेल सुगंधीत तंबाखू विक्री ?
चंद्रपूर जिल्ह्यात दररोज लाखों रुपयांचा सुगंधीत तंबाखू हा खर्यांत वापराला जातं आहे, तो सुगंधीत तंबाखू नेमका कुठून येतो? तो कोण आणतोय? यांची चौकशी केली असता वसीम झिंगरी चंद्रपूर, जयसुख ठक्कर बल्लारपूर व गणेश (ध्रुव) गुप्ता चंद्रपूर रयतवारी (सदानंद ) हे तीन महारथी मागील अनेक वर्षांपासून अवैध सुगंधित तंबाखूच्या धंद्यात असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या तिन्ही लोकांनी सुगंधीत तंबाखू ची विक्री कोण कुठे करणार व कुणाला किती पैसे द्यायचे याबद्दल अगोदरच ठरवून घेतले आहे. यामध्ये अन्न औषधी विभाग व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मैनेज केल्याने त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात आपलं अवैध नकली सुगंधित तंबाखूच जाळं पसरवलं आहे. यामध्ये हेच मोठे व्यापारी प्रत्तेक पेटीमागे 5 हजार रुपये आरक्षित ठेऊन त्या पैशातून पोलीस प्रशासन, अन्न औषधी प्रशासन व पत्रकार यांना किती महिना द्यायचा याबाबात निर्णय घेतात व त्यांच्याकडून छोट्या व्यापाऱ्यांना मग केवळ स्थानिक स्थरावर मैनेज करावे लागते. म्हणजे सुगंधीत तंबाखूचा व्यापार अगदी शिस्तबद्ध पद्धतीने केला जातो.
वसीम झिंगरी,जयसुख ठक्कर व गणेश (ध्रुव) गुप्ता हे नकली सुगंधीत तंबाखू ची विक्री करत आहे ते पोलीस अधीक्षक यांच्यासह अन्न औषधी प्रशासन व इतर आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना माहीत असताना सुद्धा त्यांचा हा धंदा राजरोसपणे सुरू आहेत यावर कोण पायबंद घालणार ? व कर्करोगाला निमंत्रण देणाऱ्या हय़ा धंद्यातील व्यापाऱ्यांना कोण जेरबंद करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
गणेश (ध्रुव) गुप्ता या अवैध तंबाखू व्यापाऱ्यांची पाच वर्षात कोट्यावधीची कमाई ?
चंद्रपूर रयतवारी येथे मागील पाच ते सहा वर्षांपासून गणेश (ध्रुव) गुप्ता हे स्वतः सुगंधीत तंबाखू चा कोट्यावधी चा व्यापार करत असून काही महिन्यांपूर्वी गोंदिया पोलिसांनी सुमो मधे असलेला चाळीस लाखांचा सुगंधीत तंबाखू पकडला होता. दरवर्षी या गुप्ता द्वारे कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता विकत घेतल्या जातं असल्याची माहिती असून मागील पाच वर्षांपासून यांनी जवळपास 15 ते 20 कोटी रुपयांची चल अचल संपती गोळा केली असल्याची चर्चा असल्याने सुगंधीत तंबाखू च्या या धंद्यात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती समोर येत आहे. या गुप्ताचे पोलीस व अन्न औषधी प्रशासनासोबत मधुर संबंध असल्याची माहिती आहे त्यामुळेच हे गुप्ता वडील पुत्र कोट्यावधी रुपयांची महिन्याकाठी उलाढाल करत असल्याचे बोलल्या जातं आहे.