Home भद्रावती स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे विविध सामाजिक उपक्रम.

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे विविध सामाजिक उपक्रम.

नॅशनल सिनियर अॅण्ड मास्टर्स क्लासिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२२, माजी आमदार कै. म. ना. पावडे भव्य कबड्डी चषक, भव्य रक्तदान शिबिर, दिव्यांगासाठी सायकल वाटप इत्यादी उपक्रमाचा समावेश.

भद्रावती प्रतिनिधी :-

स्वा. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपुरद्वारा वरोरा-भद्रावती तालुक्यातील जनतेकरिता १३ ते १६ ऑक्टोबरपर्यंत स्थानिक श्री मंगल कार्यालयात विविध लोकोपयोगी सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये नॅशनल सिनियर अॅण्ड मास्टर्स क्लासिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२२, माजी आमदार कै. म. ना. पावडे भव्य कबड्डी चषक, भव्य रक्तदान शिबिर, दिव्यांगासाठी सायकल वाटप आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

नॅशनल सिनियर अॅण्ड मास्टर्स क्लासिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप – २०२२ मध्ये देशभरातून ५०० खेळाडू सहभागी होत आहेत. यातील काही खेळाडू हे आयएएस, आयपीएस पदावर असलेले खेळाडू आहेत. उल्लेखनीय म्हणजे पॉवर लिफ्टिंग इंडियाचे अध्यक्ष निवृत्त आयएस अधिकारी राजेश तिवारी, सचिव अर्जुन अवार्डी, पी. जे. जोसेफ, विदर्भ पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश पाचपोर, सचिव सचिन माथणे, जिल्हा शक्तित्तोलन असोसिएशन, चंद्रपूरचे उपाध्यक्ष रवींद्र गुरुनुले यांच्या नेतृत्वात हे खेळाडू सहभागी होत आहे. या चॅम्पियनशिपमधून विजेता ठरणाऱ्या खेळाडूंची दुबई येथील आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपकरिता निवड होणार आहे. माजी आमदार कै. म. ना. पावडे हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक होते. त्यांनी या जिल्ह्यात सहकार क्षेत्राचा पाया घातला. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भव्य कबड्डी चषक घेण्यात येत आहे. या स्पर्धेकरिता वरोरा व भद्रावती तालुक्यातून अनेक संघ सहभागी होत आहेत. या दोन्ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी शहरातील मुख्य मार्गावरून खेळाडूंची प्रेरणा रॅली निघणार

आसा या आरोग्य अभियानाअंतर्गत दिव्यांग बांधवांना सायकल वाटप केले जाणार आहे. तर भद्रावती येथे रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. उद्घाटन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी प्रसिध्द विधीज्ञ तथा धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपुते राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी, विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, अॅड. विजय मोगरे, तहसीलदार डॉ. अनिकेत सोनावणे, तहसीलदार रोशन मकवाने, अॅड. भूपेंद्र • रायपूरे, अॅड. गजानन बोढाले, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. विजय देवतळे, भद्रावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट डॉ विवेक शिंदे आदी राहणार आहेत. कोरोना व अतिवृष्टी या आपत्तीतून निघाल्यानंतर समाजात पुन्हा एकदा स्फूर्ती व चैतन्य जागावे, जगण्याला बळ मिळावे व माणूस म्हणून आयुष्य जगण्याची कला अविरत व्हावी, या हेतूने क्रीडा स्पर्धा, दिव्यांगांना सायकल वाटप, रक्तदान शिबिर, सांस्कृतिक महोत्सव असे विविध सामाजिक उपक्रम वरोरा व भद्रावती तालुक्यातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आल्याचे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी सांगितले आहे. या निमित्ताने कायद्याच्या चौकटीत राहून युवकांनी कसे काम करावे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा वरोरा, भद्रावती तालुक्यातील जनतेनी लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टचे धनराज आस्वले, दत्ता बोरेकर, भास्कर ताजने, खेमराज कुरेकर, रोहन कुटेमाटे, विश्वास कोंगरे तथा आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here