Home मुंबई धक्कादायक :- उद्धव ठाकरेच्या घरातून शिवसेना चोरीला?

धक्कादायक :- उद्धव ठाकरेच्या घरातून शिवसेना चोरीला?

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया.

मुंबई न्यूज :

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या पद्धतीने शिवसेना फुटली व ठाकरे – शिंदे गट तयार होऊन एकामेकांच्या विरोधात शाब्दिक लढाया झाल्या त्या बघता हे राजकारण कुठल्या स्थरावर जाईल याचा अंदाज काही राजकीय विश्लेषकांना झाला होताच पण ज्या पद्धतीने शिवसेना फुटली व आता पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्हच निवडणुक आयोगाने गोठवले त्यामुळे शिवसेना पक्षातील अनेकांना धक्काच बसला व त्यातच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या जयंत पाटील पाटलांना सुद्धा बसला. त्यांची पहिली प्रतिक्रिया होती की निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे तो धक्कादायक असून उद्धव ठाकरे यांच्या घरातून शिवसेना चोरीला गेल्याचा हा प्रकार आहे असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या घरातून शिवसेना पक्ष चोरीला गेला आहे. तो कोणाच्या घरात गेला हे पहावे लागेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here