Home वरोरा परप्रांतातील ट्रॅक्टर्स चालकांना विरोध सामाजिक द्रुष्टीने- रमेश राजूरकर

परप्रांतातील ट्रॅक्टर्स चालकांना विरोध सामाजिक द्रुष्टीने- रमेश राजूरकर

मनसेने प्रशासनाला दिलेल्या निवेदनामुळे राजकीय हेतूने व  गैरसमजूतीने शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया?

वरोरा प्रतिनिधी :

वरोरा भद्रावती या दोन तालुक्यात राजस्थान व मध्यप्रदेश या प्रांतातून काही व्यापारी हे ट्रॅक्टर सह (हडम्बे) सोयाबीन चणा काढणी यंत्र दरवर्षी आणतात व त्यांचा मुक्काम हा गावागावात असतो, दरम्यान त्यांच्या माध्यमातून गावातील मुली व महिलांची छेड काढणे, त्यांना पळवणे व त्यांची राजस्थान मधे विक्री करणे, स्थानिक ठिकाणी श्रीमंत शेतकऱ्यांच्या घरी चोऱ्या करणे इत्यादी प्रकार होतं असल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या परप्रांतीय ट्रॅक्टर्स मालक व त्यावर काम करणाऱ्या कामगारांचे पोलीस सत्यापन करून त्यांच्या वाहनांची तपासणी करा व त्यांच्या बेकायदेशीर कामामुळे त्यांच्यावर प्रतिबंध लावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे नेते रमेश राजूरकर यांच्या नेत्रुत्वात उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून प्रशासनाला दिला आहे अशा प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्याने काही शेतकऱ्यांनी या संदर्भात मला फोन करून स्थानिक ट्रॅक्टर्स चालक हे मनमानी करतात व राजस्थान मधून आलेल्या ट्रॅक्टर्स धारकाकडून चांगले काम होते अशा तक्रारी माझ्या मोबाईलवर केल्या परंतु हा विषय सामाजिक असून आपल्या क्षेत्रात परप्रांतीयांकडून चुकीचे काम होऊ नये व स्थानिक ट्रॅक्टर्स व सोबत हडम्बे धारक यांच्यावर अन्याय होऊ नये अशी यामागची माझी भूमिका होती त्यामागे माझ्या शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होईल अशी माझा काही उद्देश नव्हता अशी प्रतिक्रिया मनसेचे जेष्ठ नेते रमेश राजूरकर यांनी प्रसारमाध्यमांत दिली आहे.

स्थानिक वरोरा, भद्रावती या तालुक्यात जवळपास 300 पेक्षा जास्त युवा शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर्स व त्यासोबत हडम्बे(पीक काढणी यंत्र) कर्ज काढून घेतले आहे पण राजस्थान व मध्यप्रदेश प्रांतातून येणाऱ्या ट्रॅक्टर्स मुळे त्यांना ऐन पीक काढण्याच्या मोसमात कमी काम मिळते पर्यायाने ते बैंकेचे कर्ज भरू शकत नाही. अगोदरच कर्जात बुडालेला शेतकरी मग हवालदिल होऊन आत्महत्या सारखा पर्याय निवडतो, त्यामुळे स्थानिक बेरोजगार शेतकरी युवकांचा हक्काचा रोजगार परप्रांतातून येणाऱ्या ट्रॅक्टर्स व हडम्बे धारक हिसकावून घेत असल्याने त्यांच्यावर प्रतिबंध लावा अशी मनसेने दिलेल्या निवेदनातून प्रशासनाकडे मागणी केली आहे. परंतु काही शेतकऱ्यांनी या संदर्भात आक्षेप घेऊन माझ्या भूमिकेचा विपर्यास केला व राजकीय हेतूने मला फोन करून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला तो अंत्यत चुकीचा असून स्थानिक ट्रॅक्टर्स धारकांना काम देणे त्यांना फायदा पोहचविने पण त्यात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये ही प्रामाणिक भूमिका माझी असतांना काही राजकीय विरोधक या संदर्भात प्रश्न निर्माण करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करताहेत जे चुकीचे व दिशाभूल करणारे असून माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे असेही मनसे नेते रमेश राजूरकर यांनी आपल्या प्रशिद्धि पत्रकातून नमूद केले आहे

Previous articleधक्कादायक :- उद्धव ठाकरेच्या घरातून शिवसेना चोरीला?
Next articleधक्कादायक :- ग्राम पंचायत आटमुर्डी येणाऱ्या बेलगावच्या नळातून नारू ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here