गावकऱ्यांना दूषित व दोषयुक्त पाणी दिल्याने स्वच्छ जल योजनेचे तीनतेरा ?
वरोरा प्रतिनिधी :–
जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकारने स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे म्हणून गावागावात नळ योजना आणली पण आता या योजना स्थानिक गावपातळीवर कुचकामी ठरत असून नळातून येणाऱ्या पिण्याच्या पाण्यात चक्क नारू मिळत असल्याने गावातील नागरिकांच्या आरोग्याशी ग्रामपंचायत व त्यात समाविष्ठ पाणी पुरवठा समिती खेळ खेळत आहे कां ?असा प्रश्न निर्माण होतं आहे.
वरोरा तालुक्यातील ग्राम पंचायत आटमुर्डी अंतर्गत येणाऱ्या बेलगाव गावांत पाणी पुरवठा योजनेत नळातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू असताना आज सकाळी गावातील महिला नळाद्वारे पाणी भरत असताना अचानक नळाच्या पाण्यात नारू दिसले त्यामुळे सादर पाणी महिलेने एका बॉटल मधे भरून ग्रामपंचायत प्रशासनाला दाखवण्यासाठी ठेवले दरम्यान गावातील इतर महिलांनी या संदर्भात तीव्र संताप व्यक्त केला असून गावाच्या पाणी पुरवठा योजनेच्या ढिसाळ कारभाराचा चांगलाच समाचार घेतला आहे. याची गंभीर दखल पंचायत समिती जिल्हा परिषद प्रशासनाने घ्यावी अशी मागणी येथील महिलांनी केली आहे.