Home वरोरा नेत्ररोग तपासणीला प्रचंड प्रतिसाद 720 रुग्णांची तपासणी तपासणी 242 शस्त्रक्रिया होणार.

नेत्ररोग तपासणीला प्रचंड प्रतिसाद 720 रुग्णांची तपासणी तपासणी 242 शस्त्रक्रिया होणार.

विरांगणा राणी झलकारी बाई बहुउद्देशीय संस्थे च्या अध्यक्षा रंजनाताई पारशिवे यांच्या वाढदिवशी अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन.

वरोरा :

दिनांक 10/10/22 रोजी विरांगणा राणी झलकारी बाई बहुउद्देशीय संस्था व महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर चा संयुक्त विद्यमाने वरोरा येथील साई मंगल कार्यालय येथे नेत्र तपासणी व निशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व सिकलसेल तपासणी शिबिराच्या आयोजन 10.00 वा. केले गेले होते या तपासण्या पाच वाजेपर्यंत सुरू होत्या शहरातील तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांनी शिबिरात मोठ्या प्रमाणात उपस्थित ती दर्शविली. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर डोळ्यांचे आजार वायू प्रदूषणामुळे होत असल्यामुळे हजारो लोकांना पाहिजे त्या प्रमाणात उपचार मिळत नाही तेव्हा ही सोय सामाजिक संस्थांच्या माध्यमातून करून दिल्यास हजारो लोकांच्या डोळ्यांचे संरक्षण करता येऊ शकते. त्यामुळे हा उपक्रम विरांगणा राणी झलकारी बाई बहुउद्देशीय संस्था वरोरा च्या माध्यमातून संस्थेच्या अध्यक्षा सौ.रंजनाताई पारशीवे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आयोजित केला गेला होता.

या शिबिरात 720 रुग्णांची तपासणी होऊन 240 रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे अशा 240 रुग्णांची निवड या शिबिराच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी करण्यात आलेली आहे. उर्वरित नेत्ररोग्यांना चष्म्यांचे वाटप सुद्धा विरांगणा राणी झलकारी बाई बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून केले जाणार आहे. या शिबिराचे उद्घाटन मा. सौ. प्रतिभाताई धानोरकर आमदार वरोरा तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री .कृष्णाजी नागापुरे ज्येष्ठ समाजसेवक या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री. अँड मोरेश्वरजि टेंमूर्डे साहेब माजी विधानसभा उपाध्यक्ष म.रा. मा.श्री .अँड. राजेंद्रजी महाडोळे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय ओ बी सी क्रांतिदल मा.श्री सुभाषजी शिंदे साहेब उपविभागी दंडाधिकारी वरोरा मा.श्री. रोशन मकवाने मॅडम तहसीलदार वरोरा,मा.श्री रमेश जी राजुरकर, प्रसिद्ध उद्योगपती मा.श्री .अमोल दादा गुरनुले, सुशिलाताई तेलमोरे ,सो .योगिता ताई लांडगे उपस्थित होते. प्रास्ताविक मा.सौ.रंजनाताई पारशिवे यांनी तर सूत्रसंचालन कुमारी रचना आत्राम यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लीलाताई पचारे ,आशाताई डोंगरे, सौ.सुनिता ताई शिवरकर, सौ मंजुषा पारशिवे,सौ ज्योतीताई रेंगुंडवार, सौ.गीता ताई नवले ,बेबीताई किनाके ,सौ .ताराबाई मते ,मीनाताई वडे ,शीलाताई कोटनाके ,रिंकू ताई खोब्रागडे ,गोरघाटे ताई ,सौ .कमलाताई जांभुळे सौ.योगिता ताई पचारे, सौ.नंदाताई आसुटकर ,श्रीमती अलकाताई आंबाडे, सौ. द्रुपदा काळे ,सौ .कुंदाताई करलुके, सौ .नंदाताई करलुके व तुषार थेरे , साहील ढेगळे ,शंकर खामनकर ,राहुल नगराळे ,शुभम झाडे ,अमित नन्नवरे ,ओम नवले ,यांनी यशस्वीपणे प्रयत्न करून शिबिर यशस्वी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here