सर्पमित्रयांच्या सत्काराने समाजातं काम करण्याचे बळ मिळाले असल्याची सत्कारमुर्ति यांची प्रतिक्रिया.
चद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील सर्प मित्र अपास संस्थाचे विशाल मारोती मोरे भद्रावती तालुक्यातीलसर्प मित्र श्रीपाद भाकरे,सर्प मित्र शुभम मुरकुटे,दीपक यांना द रियल हिरो पुरस्काराने व भद्रावती तालुक्यांतील अनुप येरणे यांना सर्प अभ्यासक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.सर्पमित्र विशाल मोरे हे गेल्या 15 वर्षांपासून सर्प मित्र म्हणून काम करतात . त्यांनी आजपर्यंत वाघ, बिबट,मोर , हरीण, उदमांजर, घुबड, घार, मगर, घोरपड,मुंगूस, करकोचे,तरस, कासव,अशा अनेक प्राणी पक्षाचा जीव वाचवले आहेत. हजारो सापांना जीवदानही दिले आहेत , त्यांनी पंकज,हर्षद,वैभव बंटी अमित सूरज,हर्षल, वैभव अपास टीम ने अनेक ठिकाणी कार्यक्रम घेऊन या भागातील सापा बद्दलची भीती नष्ट केली आहे व त्यांनी कांही सर्पमित्र घडवले आहेत. याची दखल घेऊनच त्यांना 23 सप्टेंबर 2022 रोजी द रियल हिरो या पुरस्काराने हिंगोली येथे सन्मानित करण्यात आले . हा पुरस्कार जो मिळाला तो माझा मोठेपणा नसून माझे गुरुवर्य व मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या ज्या लोकांनी मला मदत केली त्यांचाच आहे . हा मोठेपणा माझ्या गावाचा , तालुक्याचा व जिल्याचा सन्मान आहे असे यांनी आपल्या भावना अपास संस्थाचे अध्यक्ष विशाल मारोती मोरे व्यक्त केल्या .
हा सोहळा विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ पहेली हिंगोलीच्या वतीने घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सर्पतज्ञ निलीमकुमार खैरे ,सर्पतज्ञ डॉ . संजय नाकाडे , पप्पूभाऊ शेळके व विजय पाटील , भीमाशंकर गाडवे हे होते यावेळी कांहीं सर्प मित्रांनी आपले मनोगत व्यक्त केले.