Home वरोरा शहरातील पाणी प्रश्न पेटला, मनसेचा नगरपरिषद प्रशासनाला निर्वाणीचा इशारा.

शहरातील पाणी प्रश्न पेटला, मनसेचा नगरपरिषद प्रशासनाला निर्वाणीचा इशारा.

पाणी पुरवठा व मशनरी मेन्टनन च्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मनसेची मागणी.

वरोरा :-

वरोरा शहराचा पाणी प्रश्न पेटला असून मागील अनेक दिवसांपासून शहारातील नळ योजना बंद असल्याने नागरिकाना पिण्याचे पाणी मिळाले नाही व पुन्हा १० ऑक्टोबर पर्यंत ते पाणी मिळणार नाही असे नगरपरिषद प्रशासनाचे म्हणणे आहे त्यामुळे नागरिकांच्या या ज्वलंत प्रश्नालाघेऊन मनसेचे जेष्टनेते रमेश राजूरकरयांच्या नेत्रुत्वात काल दिनांक ७ ऑक्टोंबरला मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन पाणी पुरवठा करणाऱ्या व त्याचे मेन्टननकरणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा व शहरातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तात्काळ निकालीकाढा अन्यथामहाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.

मागील अनेक वर्षांपासून अनेक पक्षाची नगरपरिषद मधे सत्ता असताना व त्यांच्याकडून मोठमोठ्या घोषणा झाल्या असताना शहरातील नागरिकांना मात्र पिण्याचे शुद्ध पाणी सत्ताधारी व नगरपरिषद प्रशासन देऊ शकले नाही ही लोकशाहीची शोकांतिकाच म्हणावी लागेल. महत्वाची बाब म्हणजे नगरपरिषद मधे सत्ताधारी यांनी आजवर कमिशन घेऊन कंत्राटदारांना कंत्राटे दिली व सत्ताधारी यांनी त्या कामांत लाखों रुपये कमावले त्यामुळे कंत्राटदार हे सैराट झाले व त्यांनी पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न गांभीर्यानं न घेता वरोरा शहरातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी देण्यास हयगय केली ही वस्तुस्थिती आहे.

वरोरा शहराच्या पाणी पुरवठ्याचे जे कंत्राट वाभिटकर यांना देण्यात आले त्यात नगरपरिषद प्रशासनातील अधिकारी व सत्ताधारी यांचा कमिशन चा वाटा आहे तर दुसरीकडे हा कंत्राटदार आपल्या कामगार कर्मचारी यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन न देता अगदी चार ते सहा हजार रुपये वेतन देऊन मोठ्या प्रमाणात कमिशनखोरी करत आहे. पण याकडे नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी दखल घेतलेली नाही. पाणी पुरवठा मेन्टनन्स चे कंत्राट हे पाच लाखात वणी येथील कंत्राटदारांना देऊन ते काम माजी नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल झोटिंग चालवीत असल्याची माहिती आहे . शिवाय ६५ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना कागदात गुंडाळून ठेवली असून भाजप काँग्रेस च्या संयुक्त सत्ताधारी यांनी तब्बल पाच वर्ष शहरातील जनतेला मूर्ख बनवले आहे. राज्यात, केंद्रात व नगरपरिषद मधे सत्ता असणाऱ्या भाजपने आता सत्ता गेल्यावर निवेदने देण्याचे काम चालवून पुन्हा शहरातील नागरिकांचा मूर्ख बनविण्याचे काम सुरू केल्याने आपण पाणी प्रश्नावर तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा च मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष राजुभाऊ कुकडे यांनी दिला आहे.

यावेळी मनसेचे जेष्ठ नेते रमेश राजूरकर. जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे ,जिल्हा सचिव विनोद सोनटक्के ,तालुका अध्यक्ष वैभव डहाने, तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी, विभाग अध्यक्ष राजेंद्र धाबेकर, प्रकाश धोपटे.नामदेव जिवतोडे.

महिला शहर अध्यक्षा पौर्णिमा शेट्टी, शहर संघटिका ज्योती मुंजे, शहर उपाध्यक्ष शुभांगी मोहरे.अनिता नकवे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here