Home चंद्रपूर विशेष :- स्वर्गीय सुरेश धोपटे यांच्या पत्रकारितेचा वारसा पूढे घेऊन जाणारे पत्रकार...

विशेष :- स्वर्गीय सुरेश धोपटे यांच्या पत्रकारितेचा वारसा पूढे घेऊन जाणारे पत्रकार राजू बिट्टूरवार.

चंद्रपूर शहरात पत्रकारितेत विविधता जोपासणाऱ्या पत्रकार राजू बिट्टरवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव.

व्यक्तीविशेष :-

सध्या चंद्रपूर सह महाराष्ट्रातील पत्रकारिता क्षेत्रात हौसे-नवसे-गवसे यांची वाढलेली प्रचंड गर्दी व त्या गर्दीत हरवलेली खरी पत्रकारिता असे काहीसे विदारक चित्र बघावंयास मिळत आहे, पण अशाही पत्रकारितेच्या कोलाहलात सुरेश धपाटे सारखे लढवय्ये पत्रकार आपल्या धारदार लेखणीने कायम वाचकांच्या व विशेषता राजकारण्याच्या स्मरणात राहतील असे त्यांचे लिखाण होते, आज सुरेश धोपटें आपल्यात नाही पण त्यांच्या तालिमित वाढलेले व त्यांच्या प्रखर पत्रकारितेत अप्रत्यक्ष सहभागी असलेले राजू बिट्टूरवार हे त्यांचा पत्रकारितेतील वारसा पुढे घेऊन जाण्यास तत्पर असल्याचा प्रत्यय येत आहे, राजू बिट्टूरवार यांचा पत्रकारितेतील प्रवास हा जनसामान्यांच्या प्रश्नांचा वेध घेणारा ठरला आहे, आज त्यांचा 7 ऑक्टोबर ला वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांची पत्रकारिता अशीच जणसामान्यांना न्याय देणारी ठरो व त्यासाठी परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो हीच सर्वांची प्रार्थना असेल.

चंद्रपूर शहरांत राजू बिट्टू्रवार यांची पत्रकारिता ही तब्बल विष वर्षांपासून आहे त्यांचा स्वतःचा आठवडी विदर्भ हा साप्ताहिक पेपर आहे तर ते याच नावाने न्यूज पोर्टल पण चालवितात, कुठलीही घटना असो त्याबाबत त्यांची अचूक व शोधपूर्वक माहिती त्यांच्या बातमीत असतें आणि म्ह्णून त्यांची बातमी प्रकाशित झाली की संबंधित व्यक्तीच्या जणू कानशिलात माराण्यासारखा अनुभव अनेकांना आला आहे. अशाच एका बातमीच्या संबंधाने त्यांच्यावर आकशापोटी गुन्हा पण दाखल करण्यात आला पण त्यातून सुद्धा त्यांनी बोध घेऊन समोरील आपली पत्रकारीता आणखी प्रखर केल्याचं त्यांच्या बातमी वरून दिसत आहे.

अतिशय नम्,अभ्यासू आणि खऱ्या वस्तुस्थितीचा वेध घेण्याचं सामर्थ्य असलेले राजू बिट्टू्रवार हे स्वर्गीय जेष्ठ पत्रकार सुरेश धोपटें व किशोर पोतनवार यांचे पटशिष्य आहेत. त्यांचे अनेक विषयाच्या अनुषंगाने विशेषांक प्रकाशित होत असतात व ते अंक संग्रह करून ठेवण्यासारखे वाचनीय व अभ्यासापूर्ण असतात आणि म्हणूनच त्यांच्या पत्रकारितेत एक प्रकारची विविधता बघावंयास मिळत असतें, राजू बिट्टू्रवार यांचा पत्रकारिता क्षेत्रात मोठा चाहता वर्ग आहेत व अनेक पत्रकार संघात ते पदाधिकारी व सदस्य आहे. आज त्यांच्या वाढदिवशी त्यांना परमेश्वर दीर्घायुष्य देवो व त्यांच्या हातून मोठे समाजकार्य घडो हीच इच्छा आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here