Home क्राईम स्टोरी वेकोलितील ढिगाऱ्याच्या माती चोरी प्रकरणी वाहने जप्त.

वेकोलितील ढिगाऱ्याच्या माती चोरी प्रकरणी वाहने जप्त.

वेकोलि सुरक्षा अधिकाऱ्यांची पोलिसांत तक्रार. विडियो व्हायरल.

घुग्गुस प्रतिनिधी –

घुग्गुस परिसरात कोळसा चोरी नंतर आता वेकोलिच्या माती ढिगाऱ्यातून माती चोरी सुद्धा होतं असल्याने घुग्गुस हा चोरट्यांचा अड्डा बनला की काय ?असा प्रश्न उपस्थित होतं आहे. दिनांक ,27 सप्टेंबरला नकोडा लगत असलेल्या वेकोलि खदान च्या माती ढिगाऱ्यातून माती चोरी होतं असल्याची माहिती वेकोलि च्या सुरक्षा रक्षकाला मिळताच त्यांनी त्या ठिकाणावर धाव घेऊन त्या ठिकाणी माती उत्खनन करणाऱ्या जेसीबी एक हायवा ट्रक व तीन ट्रॅक्टर जप्त केले.

या प्रकरणी वेकोलिचे प्रभारी सुरक्षा अधिकारी तिरुपती गिर्हे यांनी घुग्गुस पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असता पोलिसांनी काही वाहनांच्याड्रायव्हर सह जेसीबी हायवा ट्रक व ट्रॅक्टर जप्त केली आहे व या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Previous articleमाढेळी ग्रामपंचायत च्या भोंगळ कारभारानेच तीन महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद ?
Next articleविशेष :- स्वर्गीय सुरेश धोपटे यांच्या पत्रकारितेचा वारसा पूढे घेऊन जाणारे पत्रकार राजू बिट्टूरवार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here