Home वरोरा माढेळी ग्रामपंचायत च्या भोंगळ कारभारानेच तीन महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद ?

माढेळी ग्रामपंचायत च्या भोंगळ कारभारानेच तीन महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद ?

माढेळी ग्रामवासियांनी ग्रामपंचायत प्रशासनावर ओढले ताशेरे. पाणी विकत घेण्याची वेळ.

माढेळी प्रतिनिधी :-

यावर्षी झालेल्या मोठ्या पावसामुळे व त्यामुळे आलेल्या पुरामुळे नदी काठावरील गावांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर होता कारण नदीमध्ये असलेल्या विहिरी व त्यात बसवलेल्या मोटर्स बंद झाल्याने पाणी पुरवठा होतं नव्हता पण नदी काठावरील असलेल्या अनेक गावांचा पाणी पुरवठा सुरळीत सुरू झाला असताना सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माढेळी गावात मात्र तीन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुराचे कारण समोर करून ग्रामपंचायत प्रशासन आपली बाजू भक्कम दाखवत असले तरी इतर गावांच्या तुलनेत मोठ्या असणाऱ्या ग्रामपंचायत ची अशी अवस्था होणे म्हणजे ग्रामपंचायत मधे भोंगळ कारभार होतं असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

कुठलीही प्रशासन व्यवस्था ही नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजे पासून वंचित ठेऊ शकत नाही व त्यात पाणी हे जीवनावश्यक असल्याने त्याची व्यवस्था करून देणे हे ग्रामपंचायत प्रशासनाचे कर्तव्य आहे मात्र ग्रामपंचायत माढेळीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करून दिली नसल्यामुळे माढेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यांना धारेवर धरले आहे.

पाणी विकत घेण्याची ग्रामस्थांवर वेळ

मागील तीन महिन्यांपासून माढेळी गावाचा पाणीपुरवठा पूर्णता बंद असल्याने ग्रामस्थांना २० रुपये खर्चून डबकी भर पाणी विकत घ्यावे लागत आहे. जेंव्हा की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने टँकर ने माढेळी ग्रामस्थांना पाणी पुरवठा करणे गरजेचे होते. आता दोन तीन दिवसात पाणी पुरवठा सुरू होईल पण आजपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी खर्च झालेले जनतेचे पैसे कोण भरून देणार ? हा प्रश्न उभा ठाकला आहे. ग्रामपंचायत प्रशासन जर ग्रामस्थांना पिण्याचे पाणी देऊ शकत नसेल तर मग त्या सरपंच उपसरपंच व सदस्यांची काय आवश्यकता ?असा सवाल ग्रामस्थ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here