Home Breaking News ब्रेकिंग :- चिंचाळा गावाजवळ भीषण अपघात दोघांचा जागीच मृत्यु.

ब्रेकिंग :- चिंचाळा गावाजवळ भीषण अपघात दोघांचा जागीच मृत्यु.

डीएनआर ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार टक्कर. या अपघाताच्या घटनेने सर्वत्र हळहळ.

चंद्रपूर /पडोली प्रतिनिधी :-

पडोली घुग्गुस मार्गावर चिंचाळा येथे सकाळी 10.50 च्या दरम्यान दुचाकीला डीएनआर ट्रॅव्हल्स ची जोरदार धडक झाल्याने अंकित मत्ते वय 18 व संकेत झाडे वय 24 यांचा घटनास्थळीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान हा भीषण अपघात बघण्यासाठी आलेल्या नागरिकांनी काही काळं रस्ता रोकला होता मात्र पडोली पोलिसांनी वेळीच यावर अंकुश लावून जमावाला हटवले.

पडोली घुग्गुस हा रस्ता दोन मार्गी असताना सुद्धा हा अपघात होणे फारच खेदजनक असून नेमका दुचाकी स्वाराचा की डीएनआर ट्रॅव्हल्स च्या ड्राइवर चा गुन्हा आहे याबद्दल तर्क वितर्क लावल्या जातं आहे.

Previous articleखळबळजनक :- पोलीस उपनिरीक्षक व एका जमादारात फ्री स्टाईल हाणामारी ?
Next articleमाढेळी ग्रामपंचायत च्या भोंगळ कारभारानेच तीन महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here