Home भद्रावती भद्रावती मधील मल्हारीबाबा सोसायटीत हनुमान मंदिराच्या बांधकामाला संरक्षण द्या.

भद्रावती मधील मल्हारीबाबा सोसायटीत हनुमान मंदिराच्या बांधकामाला संरक्षण द्या.

मनसे शहर अध्यक्ष युगल ठेंगे यांच्या नेत्रुत्वात मुख्याधिकारी, तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन.

भद्रावती प्रतिनिधी :

शहरातील मल्हारीबाबा सोसायटी येथे हनुमानजीची मुर्ती चबुतरा उभारून ओपन स्पेस वर बऱ्याच वर्षा पासुन स्थापीत आहे. परंतु हनुमान मुर्ती उघडयावर (मंदिर चे बांधकाम नसलेली) असल्याने पावसाळ्यात व उन्हाळ्यात हनुमान भक्तांना मुर्तीची पुजा अर्चना करायला अडचण जातं असल्याने इथे मंदिराचे बांधकाम येथील रहिवासी करण्यास इच्छुक आहे व येथील रहिवासीयांनी वर्गणी गोळा करून बांधकाम साहित्य पण खरेदी केले आहे यामुळं आता बांधकामास सुरुवात झाली असताना सहा महिण्यापुर्वी तेथे वास्तव्यास आलेले नितीन भैसारे हे जाणीवपूर्वक या बांधकामाला अडथळा निर्माण करून शांतता व सुव्यवस्थेला बिघडवत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भद्रावती शहर अध्यक्ष युगल ठेंगे यांच्या नेत्रुत्वात या परिसरातील नागरिकांना घेऊन मुख्याधिकारी तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन मंदिराच्या बांधकामाला संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

या उघड्यावर असलेल्या हनुमानजीच्या मूर्तीची दररोज पूजाअर्चा व दरवर्षी कार्यक्रम निरंतर सुरू आहे. सदर मुर्ती सभोवताल मंदिराचे बांधकाम करण्याकरिता परिसरातील जनते कडुन पुढाकार घेतला गेलेला आहे. लोकवर्गणीतून मंदिराचे बांधकाम करण्याचा निर्धार झालेला आहे. मंदिर बांधकामास परिसरातील सर्वांची सहमती आहे. परंतु सहा महिण्यापुर्वी तेथे वास्तव्यास आलेले नितीन भैसारे ही व्यक्ती सदर बांधकामास विरोध करीत आहे, ते पोलीस विभागात कार्यरत असल्याने सर्वांवर पोलीसी धाक दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळं त्यांच्याकडून परिसरातील सगळयांसोबत वाद उत्पन्न होऊन परिसरातील शांतता व सुव्यवस्था बाधीत होतं आहे. त्यांचं म्हणणं आहे की मी तुमचे देवाला मानत नाही, त्यामुळे मी राहात असलेल्या परिसरात कोणतेही मंदिराचे बांधकाम होवु देणार नाही, याचा अर्थ ते जाणीवपूर्वक असले वक्त्यव्य करून येथील जनतेला व भाविक भक्तांना वेठीस धरत असल्याचा गंभीर प्रकार सुरू असल्याने जर मंदिराचे बांधकाम होताना जर अडथळा निर्माण होऊन कुणाचे मानसिक संतुलन बिघडले तर मोठा विवाद उभा राहून शांतता भंग होऊ शकते त्यामळे या मंदिराच्या बांधकामाला संरक्षण देण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते स्वतः बांधकाम सुरू असताना संरक्षण देईल असा इशारा शहर अध्यक्ष युगल ठेंगे यांनी निवेदनातून दिला आहे.

का होतं आहे वाद ?

नितीन भैसारे या व्यक्तीने हनुमान मंदिराच्या बांधकामाला विरोध करण्यासाठी नगर परिषद भद्रावती ला तक्रार केली व तेथील दोन कर्मचारी घटना स्थळी आले व त्यांनी धमकी दिली की, तुम्ही मंदिराचे बांधकाम केल्यास “हनुमानजीची मुर्तीच उचलुन फेकुन देईल” अशा अर्वाच्च शब्दात बोलुन नागरिकांच्या धार्मीक भावना दुखावल्या आहे. सदर मंदिराचे बांधकाम सार्वजनीक रित्या केल्या जाईल परंतु मंदिर किंवा मंदिरातील मुर्तीस कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास परिसरातील सर्व जनते कडुन व मनसे शहर शाखा यांचे कडाडुन विरोध केल्या जाईल. त्यामुळं अशा समाजविघातक मनोवृत्तीच्या व्यक्तीस आपल्या स्तरावरून समज द्यावी, जेने करून कोणताही अनुचीत प्रकार घडु नये, अन्यथा मनसे स्टाईलने त्याला समज देण्यात येईल, त्यानंतर उदभवणाऱ्या परिणामास व परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा सुद्धा देण्यात आला. यावेळी निखिल उगे ,अभिषेक उमरे,शुभम धुर्वे, यश चौधरी , गोपाल पारधे,मुकुल मनुसमारे ,संकेत बावने,ऋषि वरखड़े,गोपाल सातपुते,शिवम परखी,यश लांडगे व इत्यादींची उपस्थिती होती.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या नांवावर राज्य सरकारने केलो शेतकऱ्यांची फसवणूक ?
Next articleग्रामपंचायत आमडी ( बेगडे) चिंचघाट मधे दोन सख्ख्या भावांच्या पैनेलची लढत गाजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here