Home वरोरा छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या नांवावर राज्य सरकारने केलो शेतकऱ्यांची...

छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या नांवावर राज्य सरकारने केलो शेतकऱ्यांची फसवणूक ?

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेपासून वंचित शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मनसेचे मुख्यमंत्र्याना निवेदन.

वरोरा :-

राज्यातील तत्कालीन भाजप-शिवसेना सरकार व त्यानंतर आलेले महाविकास आघाडी सरकार यांनी जी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत कर्जमाफी केली त्यात वरोरा तालुक्यातील जवळपास १९ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली असून या शेतकऱ्यांनी सरकार कडे व स्थानिक लोकप्रतिनिधींकडे याबाबत पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा यावर तोडगा निघाला नसल्याने मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन देऊन त्वरीत या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अन्यथा मुंबई मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.

भाजप सेना युतीने सन २०१७ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांची कर्जमाफी दिनांक १.४.२०१२ व त्यानंतर पिक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या व अश्या कर्जापैकी दि. ३०.६.२०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना काही निकषाच्या अधिन राहून सरसकट कर्जमाफी दिली व जे नियमित कर्ज फेडणारे शेतकरी आहेत त्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रूपये जाहिर करण्यात आले. दरम्यान ज्या बँक खात्यात शेतकऱ्यांचे खाते होते त्या बँक शाखेत शासनाकडून निधी जमा करण्यात आला नसल्याने त्या बँकेने शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे निकालीत न काढता त्यांनी सरकार कडून निधी आला नसल्याने तुमची कर्जमाफी किंवा कर्ज माफ होवू शकत नाही असे शेतकऱ्यांना स्पष्ट सांगितले. चंद्रपूर जिल्हयातील वरोरा तालुक्यातील १८ शेतकरी यांना अजूनपर्यंत शासन प्रशासनाकडे निवेदने व तक्रारी दिल्यानंतर सुध्दा कजमाफी झाली नसल्याने मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार वरोरा यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.

सन २०१७ ला पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे कर्ज सन २०१९ पर्यंत तसेच राहिल्याने संबंधित शेतकऱ्यांना नविन कर्ज मिळाले नाही. पर्यायाने पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नसल्याने स्वतःची शेती पडीत ठेवावी लागली ही वस्तुस्थिती आहे. दरम्यान सन २०१९ मध्ये ठाकरे सरकार (महाविकास आघाडी) अस्तित्वात आले आणि या सरकारने सुध्दा महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीची घोषणा केली. या योजनेत आपण पात्र ठरू या अपेक्षेने या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली व आपली व्यथा स्थानिक प्रशासन व संबंधित लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र तत्कालिन अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्याकडे नियमित पाठपुरावा केल्यानंतर सुध्दा कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे जवळपास पाच वर्षापासून वंचित शेतकऱ्यांची शासन प्रशासनाकडे पायपिट सूरू आहेत.

मनसेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिंदे सरकार हे राज्य शिवछत्रपतींच्या नावाने चालवतो असा आशावाद जनतेला दाखवून ते त्यांच्या नावाच्या योजनेचा जर बटटयाबोळ करत असेल तर आपण खऱ्या अर्थाने शिवछत्रपतीच्या नावाचा गैरवापर करतो हे स्पष्ट होते. त्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ दयावा अन्यथा या कर्जमुक्ती पासून वंचित शेतकऱ्यांना घेवून आपल्या मुंबई मंत्रालयासमोर शेतकरी ठिय्या आंदोलन करेल असा इशारा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित पात्र शेतकऱ्यांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी दिला आहे.

कोण आहेत लाभार्थी ?

या दोन्ही योजनेचा ज्यांना लाभ मिळाला नाही ते ते पात्र शेतकरी
भदु तुळशिराम गिरसावळे, रा. कोटबाळा, सचिन भदुजी गिरसावळे, रा. कोटबाळा, जयप्रकाश माधव गारघाटे, रा. कोटबाळा, बेबी वडगुजी सातपुते, रा. पाचगाव,अमोल सुधाकर ठाकरे, रा. पांढरतळा,सिताराम दामु देठे, रा. पांढरतळा, सुभद्रा नानाजी ठाकरे, रा. पांढरतळा, अरूण सिताराम देठे, रा. पांढरतळा गुलाब जगन गुळघाणे, रा. कोसरसार
भोलेनाथ किसनाजी भटकर रा. कोसरसार. महादेव मुंगल रा. कोसरसार प्रितम रा. कोसरसार, कवडुजी फकरूजी कारवटकर रा. कोसरसार, मेघराज दादाजी वरभे, रा. कोसरसार. नामदेव सांगुले, रा. कोसरसार रमेश रामकृष्ण मंत्री, शेखर मधुकरराव कारवटकर कोसरसार, गोविंदा गणपत काळे, रा. तुमगाव हे मागील चार वर्षांपासून शासन प्रशासनासोबत लढत आहे.

Previous articleराष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाच्या प्रदेश अध्यक्ष पदी ॲड. अमोल बावणे यांची नियुक्ती.
Next articleभद्रावती मधील मल्हारीबाबा सोसायटीत हनुमान मंदिराच्या बांधकामाला संरक्षण द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here