Home चंद्रपूर ग्रामपंचायत आमडी ( बेगडे) चिंचघाट मधे दोन सख्ख्या भावांच्या पैनेलची लढत गाजली.

ग्रामपंचायत आमडी ( बेगडे) चिंचघाट मधे दोन सख्ख्या भावांच्या पैनेलची लढत गाजली.

कट्टर भाजप कार्यकर्ते विरुध्द भाजप शेतकरी संघटना अशा लढतीत मोठा भावाचे पैनेल विजयी.

चिमूर प्रतिनिधी :-

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका खूपच रंगतदार व तेवढ्याच अटीतटीचा झाल्या असल्या तरी जे दावे राजकीय पक्ष करत आहे ते फोल झालेले ठरत असल्याचे चित्र आहे. कारण ग्रामीण निवडणुका हया कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जातं नाही शिवाय ग्रामपंचायत मधे किमान दोन किंव्हा तीनच पैनेल लढताना दिसते त्यावरून केवळ अमुक पक्षाचा अमुक कार्यकर्ता निवडून आला किंव्हा अमुक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत पैसा पुरवला म्हणून त्या पक्षाचं पैनेल निवडून आलं असं गॄहित धरून ग्रामीण भागात ग्रामपंचायतचे राजकारण सुरू असते, मात्र चिमूर तालुक्यातील आमडी (बेगडे) चिचघाट येथील शेतकरी संघटना, भाजपा समर्थित ग्राम उन्नती पॅनलचा सरपंच व इतर सदस्य निवडून आल्याचे जाहीर होताचं दुसरे पैनेल कोणते ? पडले याबद्दल चिमूर तालुक्यात मोठी चर्चा होती दरम्यान दोन सख्ख्या भावांचे तेही भाजप विरुद्ध भाजप असा सामना इथे रंगला असल्याचे चित्र होते व त्याकडे सगळ्यांच्याच नजरा या निकालाकडे लागल्या होत्या त्यात मोठा भाऊ असलेल्या राजू पाटील झाडे यांच्या शेतकरी संघटना व भाजप समर्थित पैनेलचा विजय झाला तर त्यांचा लहान भाऊ विजय पाटील झाडे यांच्या पैनेल चा निसटता पराभव झाला, मात्र एकूण ११ सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना ३ उमेदवार निवडून आणण्यात यश मिळाले आहे.

विजय पाटील झाडे हे खरेतर भाजप चे पूर्वाश्रमीचे कट्टर कार्यकर्ते पण काँग्रेस मधून आलेल्या राजू पाटील झाडे यांच्याकडे भाजपची धुरा आली आणि कट्टर भाजप कार्यकर्ते विजय झाडे यांना भाजपातच राहून सख्ख्या भावाच्या पैनेलशी लढावे लागले असल्याने चिमूर तालुक्यात या ग्रामपंचायतची निवडणुक चांगलीच गाजली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस या ग्रामपंचायत निवडणुकीत कुठेचनव्हती असे चित्र दिसत होते.

चिमूर तालुक्यातील 18 डिसेंबरला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची काल मतमोजणी झाली त्यात ग्रामपंचायत आमडी ( बेगडे ) चिंचघाट येथे शेतकरी संघटना, – भाजपा समर्थीत ग्राम उन्नती पॅनलचा सरपंच विजयी झाला असून सरपंचपदी कल्पना बंधुजी धोटे विजयी झाले व या सत्ताधारी राजू पाटील झाडे यांच्या गटाचे अविनाश योगेश्वर गाठे, दुर्गाताई प्रकाश डरे, शीतल किशोर गोरवे, नंदकिशोर दुर्योधन हिवरकर, प्रतिभा प्रमोद ढोणे,संगीता पांडुरंग सावसाकळे विजयी झाले. यात विजय पाटील गटाचे विठ्ठल महादेव रणदिवे
समीर हरी पाटील,प्रतीक्षा संतोष ढोक विजयी झाले आहे.

Previous articleभद्रावती मधील मल्हारीबाबा सोसायटीत हनुमान मंदिराच्या बांधकामाला संरक्षण द्या.
Next articleविदर्भातील सिंचन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनातं प्राणांतिक उपोषण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here