Home चंद्रपूर उपक्रम :- रामनवमीच्या निमित्याने सामाजिक कार्यकर्ते राहुल देवतळे यांच्यातर्फे चष्मे वाटप.

उपक्रम :- रामनवमीच्या निमित्याने सामाजिक कार्यकर्ते राहुल देवतळे यांच्यातर्फे चष्मे वाटप.

तब्बल दोनशे नागरिकांना मिळाला लाभ. राहुल देवतळे यांचे सर्वत्र कौतुक.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर शहरात आपल्या अनोख्या आंदोलनाने व सामाजिक कार्यांने आपली ओळख निर्माण करणारे सामाजिक कार्यकर्ते राहुल देवतळे यांनी रामनवमीच्या निमित्याने विठ्ठल मंदिर वार्डात गरीब वयस्क व बुजुर्ग महिला पुरुष नागरिकांना 2 मार्च च्या डोळे तपासणी नंतर चष्मे वाटप करण्याचा उपक्रम राबवला या दरम्यान जवळपास 200 नागरिकाना राष्ट्रवादीचे नेते दीपक जयस्वाल, राजीव कक्कडव, पत्रकार राजू कुकडे, राजू चौधरी, भाजप नेते राजेंद्र खांडेकर या मान्यवरांच्या हस्ते चष्मे वाटप करण्यात आले.

विठ्ठल मंदिर प्रभागातील समस्या घेऊन राहुल देवतळे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात व शहरातील पाणी पुरवठा विषय घेऊन आंदोलन केल्याने ते प्रकाशझोतात आले आहे त्यात आता त्यांचा आरोग्य विषयक उपक्रम राबविल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होतं आहे. चष्मे वाटप कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विठ्ठल मंदिर प्रभागातील किशोर पडगिलवार,राजू अवघडे अखिलेश राऊत नयन दोईफोंडे शुभम ठाकरे गौरव गोरे सोनू पडगिलवार इत्यादींनी परिश्रम घेतले.

 

Previous articleसीटीपीएस मधील मुख्य अभियंत्यांच्या निविदा घोटाळ्याची एसीबी चौकशी हवी.
Next articleलक्षवेधी :- खरंच एकनाथ शिंदे -देवेंद्र फडणवीस  सरकार नपुंसक आहे का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here