Home चंद्रपूर गंभीर :- महाजनको, कोल वॉशरी,खनिकर्म विभागाच्या संगनमताने कोट्यावधीचा कोळसा घोटाळा.

गंभीर :- महाजनको, कोल वॉशरी,खनिकर्म विभागाच्या संगनमताने कोट्यावधीचा कोळसा घोटाळा.

कोट्यावधीच्या कोळसा घोटाळ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंव्हा सीबीआय मार्फत चौकशीची मागणी.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

राज्यात महाजनकोला कोल वॉशरिज मार्फत वीज निर्मिती करिता दिल्या जाणाऱ्या कोळशाची मोठी हेराफेरी केली जातं असून निकृष्ट दर्जाचा गोटे माती राख मिश्रित कोळसा वीज निर्मिती कंपन्याना पाठवून चांगल्या दर्जाची विक्री खुल्या बाजारात कोल वॉशरिज च्या माध्यमातून होतं असल्याचे कित्तेक पुरावे समोर येऊन सुद्धा हा धंदा बंद झाला नसल्याने विकला जातं असल्याच्या अनेक घटना घडत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ यांच्या माध्यमातून महाजनकोसोबत झालेला निविदा करार हा विवादात सापडला आहे, कारण ज्या कंत्राटदाराला महाजनको ला कोळसा पुरवठा करण्याचे निविदेच्या माध्यमातून कंत्राटे दिली जातात त्यात कोल वॉशरिज चा कोळसा सरळ महाजनकोला न जाता तो खाजगी प्लॉटवर (कोळसा डेपो) उतरवला जातो म्हणजे यात मोठी हेराफेरी होतं असल्याने कोट्यवधी रुपयांचा कोळसा घोटाळा उघड होतं आहे. दरम्यान या कोळसा घोटाळ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अथवा सीबीआय द्वारा चौकशी केल्यास खरे कोळसा चोर समोर येऊ शकते.

महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळातील निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी नागपूरच्या विभागीय आयुक्तांची एकसदस्यिय समिती तत्कालीन उद्धव ठाकरे सरकार मधील उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गठीत करून चौकशीचे आदेश दिले होते. या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर खनिकर्म महामंडळ व महाजनको यांच्या दरम्यान कोळसा पुरवठा व स्वच्छ करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची देसाई यांनी तत्काळ दखल घेऊन उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह यांना पुढील कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार शासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी नागपुरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांची एकसदस्यिय समिती गठित केली होती व या समितीला एक महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे सांगितले होते. पण या समितीचे पुढे काय झाले हे गुलदस्त्यात असून कोळसा वाहतूक करणारे कंत्राटदार, कोल वॉशरी व महाजनको अधिकारी यांच्या संगनमताने उच्च दर्जाचा कोळसा खुल्या बाजारात व दगड माती रेती व वेस्टेज स्पंज आयर्न मिक्स केलेला कोळसा महाजनको च्या विद्युत निर्मिती प्लांट मधे पाठवला जातं असल्याने कोट्यावधी रुपयांचा कोळसा घोटाळा होतं आहे. यामध्ये ते कोण कंत्राटदार आहेत व कोल वॉशरिज कंपनीचे अधिकारी आहेत त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई होने अपेक्षित आहे.

महाजनकोला वीज निमिर्तीसाठी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या ( डब्ल्यूसीएल WCL) माध्यमातून कोळसा मिळत असतो. पण, या कोळश्याचे उष्मांक हा कमी असल्याने कोल वाशरीजच्या माध्यमातून धुवून कोळसा उपयोगात आणल्यास उत्तम दर्जाचा जास्त कॅलरीक (उष्मांक) असलेला कोळसा मिळतो. त्यामुळे कमी कोळश्यात अधिक वीज निमिर्ती होते. तसेच, दुसरे कारण म्हणजे या औष्णिक केंद्रातील मशिन अद्यावत असल्याने त्यांना आयात केलेला कोळसा पाहिजे. पण, तो कोळसा लहान असल्याने धुवून वापरल्यास ती गरज भागवल्या जाऊ शकते. त्यासाठी 2019 मध्ये कोल वाशरीज कंपनींना भाजप सरकारचे तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परवानगी देत कोळशा धुवून घेण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर टेंडर झाले होते त्यात आता भर पडली आहे.

कोळसा धुणे म्हणजे नेमके काय होते?

-महाजनकोला मिळणारा कोळसा हा धुवून देण्यासासाठी कोलवाशरीज कंपनीची नियुक्ती करते. कोळसा खाणीतून मिळणारा कोळशात दगड, माती, शेल ( उष्मांक नसलेला पांढरा कोळसा ) यात असते. त्यामुळे या कोळश्याला स्वच्छ करून दगड, माती वेगळी केली जाते. त्यानंतर पाण्याने धुवून जास्त उष्मांकचा कोळसा वेगळा करत यापासून वीज निमिर्तीसाठी वापरला जातो. पण, यात माहिती अधिकारी मागितलेल्या आकडेवारीत या कोळश्यापासून कुठलाच फायदा झाला नाही. अथवा कोळसा धुतल्याने अधिक विज निमिर्ती झाली नाही, असा दावा अनेकांनी केला आहे. कारण वीज निर्मितीसाठी महानिर्मितीचे अधिकारी कोलवाशरीजच्या अधिकाऱ्यांशी व मालकांशी संगनमत करून निकृष्ट दर्जाचा दगड माती मिक्स करून पाठवलेला कोळसा वापरून राज्याच्या वीज निर्मिती केंद्रात कोट्यावधी रुपयांचा कोळसा घोटाळा करत आहे.

कोल वॉशरिज बनल्या कोळसा चोरीचे अड्डे ?

वेकोलि कोळसा खाणीतून कोल वॉशरिजला मिळालेल्या एकूण कोळश्यातील 15 टक्क्यापर्यंत कोळसा हा रिजेक्ट केला जाऊ शकतो, असे खनिकर्म महामंडळाची नियमावली आहे. त्यामुळे हा रिजेक्ट कोल वाशरीजला 600 रुपये प्रति टनाने परत मिळतो. पण, हा रिजेक्ट कोळसा खुल्या बाजारात 15 हजार रुपये टनाने विकला जातो. सोबत दगड माती रेती राख व स्पंज आयर्न ची राख मिक्स करून तो कोळसा महाजनको ला पाठवला जातो त्यामुळे चांगला  कोळसा जाणीवपूर्वक रिजेक्शन करून खुल्या बाजारात विकला जात आहे व यामध्ये कोल वॉशरिज चे मालक कोळसा वाहतूक करणारी कंत्राटी कंपनी व महाजनको चे अधिकारी यांचे टक्के ठरलेले आहेत त्यामुळे कोळसा चोरीचे अड्डे बनलेल्याकोल वॉशरिजला बंद करून या कोळसा घोटाळा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंव्हा मग सीबीआय चौकशी केल्यास समोर येऊ शकतो.

Previous articleलक्षवेधी :- खरंच एकनाथ शिंदे -देवेंद्र फडणवीस  सरकार नपुंसक आहे का?
Next articleस्विकार दुर्बल मतिमंद मुलांच्या निवासी शाळेवर प्रशासक नेमा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here