Home लक्षवेधी मनसे आंदोलनाच्या धास्तीने खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांचे लेखी आश्वासन.

मनसे आंदोलनाच्या धास्तीने खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांचे लेखी आश्वासन.

मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांची खनिकर्म अधिकाऱ्यासोबत चर्चेअंती शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी.

कळणे प्रतिनिधी :-

सिंधदुर्ग जिल्ह्यातील कळणे मायनिंग दुर्घटना मधील नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी  जिल्हा प्रशासनाकडे  वारंवार चकरा मारल्या जातं असतांना प्रशासन याकडे डोळेझाककरत होती त्यामुळे  दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना- रस्ते साधन सुविधा व आस्थापना अध्यक्ष आणि माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनखाली कळणे मायनिंग विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले होते. याची दखल खनिकर्म विभाग सिंधुदुर्ग मधून घेण्यात आली. या संदर्भात खनिकर्म  विभागाच्या  अजित पाटील यांच्या लेखी आश्वासन नंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

प्रशासनाने दिलेले आश्वासन, तोडगा लक्षात घेता जिल्हा प्रशासनने विलंब न करता कार्यवाही करण्यात यावी आणि गेली 2 वर्ष अडलेला प्रश्न सोडवण्यात यावा अशी मागणी मनसे उपजिल्हा संघटक अभय देसाई यांनी केली. कळणे मायनिंग विषयी श्री उपरकर यांची संबंधित अधिकाऱ्याशी सविस्तर चर्चा झाली त्यावेळी अजित पाटील यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दयायचे आश्वासन दिले. यावेळी मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार जीजी उपरकर, मनविसे जिल्हा अध्यक्ष आशिष सुभेदार, जिल्हा संघटक अमोल जंगले, उपजिल्हा संघटक अभय देसाई, कुणाल किनळेकर, विशाल ओटवणेकर, संदेश शेट्ये, संदीप लाड, आबा चिपकर, निलेश देसाई, नाना देसाई उपस्थित होते.

Previous articleसंतापजनक:- भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलच्या बातमीने “आकाश बार” मालकांची पत्रकाराला धमकी ?
Next articleआश्चर्यजनक :- देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या बाबत आश्चर्यजनक खुलासे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here