Home मुंबई महाराष्ट्रात भाजप मनसे युतीचा नवा अध्याय सुरू होणार ?

महाराष्ट्रात भाजप मनसे युतीचा नवा अध्याय सुरू होणार ?

महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपला मनसेची साथ हविच ?

न्यूज नेटवर्क :

राज्यात शिंदे गट- भाजप यांच्यात युतीच सरकार आहे ते औटघटकेचं सरकार असून कुठल्याही क्षणी ते कोसळू शकते अशी परिस्थिती आहे, कारण सर्वोच्य न्यायालयाचा निकाल कधीही येऊ शकतो, अर्थात जर शिंदे गटाच्या बाजूने निर्णय लागला तर उलटफेर होणार नाही पण ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर एकनाथ शिंदे यांना तुर्तास घरी बसावे लागेल कारण ते अपात्र ठरतील. एकूणच महाराष्ट्रात भाजपला एकनाथ शिंदे गट पाहीजे त्या प्रमाणांत मतांच्या गणितात फायदेशीर ठरेल असे वाटतं नाही कारण उद्धव ठाकरे यांच्याकडे सहानुभूती राहणार आहे, जर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेची सहानुभूती कमी करायची असेल तर भाजपला मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना जवळ करून त्यांच्या सभांमधून उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आव्हान उभं करावं लागेल हे निश्चित आहे. भाजपने ज्या पद्धतीनं छडयंत्र करून उद्धव ठाकरे सरकार पाडलं ते जनतेला पटलं नाही त्यामुळं हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा खरा राजकीय वारसदार राजसाहेब ठाकरे हेच आहे हा विचार जनतेत रुजवावा लागेल तरच उद्धव ठाकरे यांच्या बद्दल जनतेची सहानुभूती कमी होऊ शकते असे राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे. अर्थात या सर्व राजकीय गणितावर भाजप मनसे युती होणं फ़ार अपेक्षित आहे व तेच भाजपला फायदेशीर ठरणार आहे.

सध्या महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे, त्यावरून महाराष्ट्रातील जनता भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या युती आघाडी सरकारला कंटाळली असं वाटतंय, कारण राज्यांच्या विकासाच्या ऐवजी सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर चिखलफेक करत आहे व हया राजकीय कुरघोड्या सर्वसामान्य जनतेच्या बुद्धीला पटणाऱ्या नाही, कारण त्यांना सरकारने विकासाच काम करावं असं वाटतं, मात्र असं घडताना दिसत नाही, अगोदरच शिंदे फडणवीस सरकार सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाकडे बघत आहे त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तार नाही आणि मंत्रिमंडळ विस्तार नाही त्यामुळे विकासाची कामे होतं नाही अशी परिस्थिती आहे. या सर्व परिस्थितीवर मात करून आपला कणखर स्वभाव बघता मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे जनतेच्या पसंतीवर खरे उतरू शकतात असं वाटतं आणि म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा वारसा मनसेच्या माध्यमातून जपण्याचे काम होतं असल्याने राजसाहेब यांच्याकडेच हिंदुत्ववादी जनता झुकणार अशी मोठी संभावना बघता भाजपला हिंदू मतांचे विभाजन परवडणारे नाही आणि म्हणून महाविकास आघाडी विरुध्द भाजप मनसे युती असा सामना येणाऱ्या 2024 मधे रंगण्याची शक्यता जास्त आहे.

उद्धव ठाकरे सरकार पडल्यावर शिंदे सरकार अस्तित्वात आलं खरं पण हे सरकार पन्नास खोके सरकार आहे असं विरोधकांनी रान पेटवलं आणि जनतेत शिंदे सरकार बद्दल संभ्रम निर्माण झाला. एकनाथ शिंदे म्हणजे भाजपची उत्पत्ती आहे आणि भाजपनेच ठाकरे सरकार पाडण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांना पन्नास पन्नास खोके दिले असल्याची चर्चा गावागावांत पोहचली. एकीकडे सर्वोच्य न्यायालयात ठाकरे शिंदे गटाचा सत्तासंघर्ष सुरू आहे आणि कुठल्याही क्षणी सर्वोच्य न्यायालयाचा निकाल येऊ शकतो त्यामुळं शिंदे फडणवीस सरकार अलर्ट मोडवर आहे. तर दुसरीकडे राज्यात दोन विधानसभा पोट निवडणुकीचा जो निकाल लागला त्यात कसबा मतदार संघात भाजपला मोठी हार पत्करावी लागली होती. खरं तर कसाब विधानसभा पोट निवडणुकीत भाजप हरली ती महाविकास आघाडीच्या तीन पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित प्रचार केल्यामुळे आणि हाच विषय येणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत घडू शकतो त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पक्ष जर एकत्रित लढले तर भाजपला मोठी तयारी करावी लागेल व त्यात हिंदूचे तेज जर कुठल्या नेत्यांमध्ये आहे तर ते आहेत राजसाहेब ठाकरे यांच्यात, त्यामुळं मोठ्या प्रमाणात मनसेच्या बाजूने हिंदू मते जाईल कारण मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे भाजप च्या कुठल्याही नेत्यांपेक्षा हिंदुत्वावर जास्त पावरफूल बोलतात व त्यांच्या सभेला माणसं आणावी लागत नाही तर ती स्वतःहून येतात. अशातच मनसेला अलग ठेवणे भाजपाला नुकसान करणारे आहे.

आज जरी भाजप स्वबळावर आपण 145 पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याच्या वल्गना करत असेल पण परिस्थिती त्याच्या विपरीत आहे आणि जर भाजप तशा भ्रमात राहिली तर महाराष्ट्रात त्यांना 50 आमदार पण निवडून आणणे कठीण जाणार आहे, कारण वाढलेली महागाई बेरोजगारी व सगळीकडे दिसत असलेला भ्रष्टाचार यामुळे अगोदरच सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेत आक्रोश आहे आणि तो मतदानातून बाहेर येऊ शकतो आणि म्हणूनच भाजपला हिंदुत्वाचे कार्ड खेळूनचं पुन्हा सत्तेत येण्याची संधी आहे पण त्यासाठी हिंदुत्ववादी मतांचे विभाजन रोखणे म्हणजे मनसेला सोबत घेण्याशिवाय पर्याय नाही असे चित्र दिसत आहे.

भाजप प्रांत अध्यक्ष बावनकुळेयांचं काय आहे वक्तव्य ?

नाशिक येथील एका कार्यक्रमात बोलताना भाजप प्रांत अध्यक्ष बावनकुळे यांनी राजसाहेब ठाकरे यांचं कौतुक केले आहे. राजसाहेब ठाकरे यांच्या प्रगल्भ वागण्यामुळे आमचे त्यांच्यासोबत चांगले संबंध असल्याचं ते म्हणालेत. याशिवाय राजसाहेब ठाकरे यांच्यासाठी भाजपचे दरवाजे उघडे आहेत, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. राजसाहेब ठाकरेंना वाटेल तेव्हा ते भाजपसोबत युती करू शकतात, असंही बावनकुळे म्हणालेत. “वैचारिक मनोमिलनासाठी आम्ही कुठेही चर्चा केलेली नाही. राजसाहेब ठाकरे आमचे एक चांगले आणि दिलदार मित्र आहेत. ते खुल्या मनाने आणि खुल्या विचाराने बोलणारे व्यक्तीमत्व आहेत”,असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

मनात एक ठेवायचं आणि बोलायचं वेगळं असे राजसाहेब ठाकरे नाहीत. कपट कारस्थान करणारे ते नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रगल्भ वागण्यावर आमचे चांगले संबंध आहेत. त्यांच्यासोबत आमची कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. पण त्यांच्या मनात भाजपसोबत यायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी नेहमी दरवाजे खुले आहेत, असं बावनकुळे म्हणाले आहेत.

राजसाहेब ठाकरे आणि भाजप नेत्यांची जवळीक वाढली.

राजसाहेब ठाकरे आणि भाजप नेत्याचं गेल्या काही दिवसांपासून जवळीक वाढली असल्याचे हे सर्वश्रूत आहे. काही दिवसांपूर्वी राजसाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. तसेच भाजप नेते आशिष शेलार यांचीदेखील भेट झाल्याचे समोर आलं होतं. मध्यंतरी भाजप नेते नारायण राणे आणि राजसाहेब ठाकरे एकाच मंचावर एकत्र आले होते. तसेच नारायण राणे यांनी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. राजसाहेब ठाकरे आणि भाजप नेत्यांची जवळीक वाढणे, तसेच भाजपने ठाकरेंना युतीसाठी खुली ऑफर देणं या घटना आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी सर्वात महत्त्वाच्या आहेत व त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजप मनसे युतीचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here