Home वरोरा दुर्दैवी :- वरोरा तालुक्यात गौळ बू. येथे मारहाणीत महिलेचा खून.

दुर्दैवी :- वरोरा तालुक्यात गौळ बू. येथे मारहाणीत महिलेचा खून.

पोलिसांनी केला दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल. आरोपींना अजूनही अटक नाही.

वरोरा प्रतिनिधी :-

तालुक्यातील गौळ बू. गावात पुंडलीक गौळकार व शुभम गौळकार यांनी मारहाण केल्याने नंदा दिलीप गौळकार (४०) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपींना पोलिसांनी अटक केली नसल्याने पती दिलीप गौळकार यांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्याची माहिती आहे.

हि घटना घडून सहा दिवसाचा कालावधी होऊनही आरोपी मोकाट गावात फिरत आहे. पोलिस उलट मृतकाच्या परिवारातील सदस्यांना चौकशीच्या नावाखाली तासनतास पोलिस ठाण्यात बसवून ठेवत असल्याने एकी कडे पत्नीच्या मृत्यूचे दु:ख सहन करीत असताना दुसरीकडे पोलिसांचा तपासासाठी दिला जात असणारा त्रास हा असहनीय होत असल्याची व्यथा मृतकाचा पती दिलीप गौळकार यांनी मांडली आहे.

२३ मार्चला पुंडलीक गौळकार, शुभम गौळकार यांनी पत्नी मंदा व दिलीप गौळकार यांनी लाथा बुक्क्यानी मारहाण केली. गावातील नागरिकांनी मध्यस्थी करीत मारहाण थांबविली. यानंतर दि. २९ मार्चला पती शेतात गेला असताना घरुन वहिणीचा फोन आला की पत्नी मंदा घरी बेशुद्ध पडली आहे. पत्नीला शासकीय रुग्णालयात भरती केले. तीची प्रकृती गंभीर झाल्याने तिला चंद्रपूर येथे खासगी रुग्णालयात रेफर केले.उपचारादरम्यान तीचा ३१ मार्चला मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू पुंडलीक व शुभम गौळकार यांच्या मारहाणीमुळे झाला असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी दिलीप गौळकार यांनी केली आहे.

Previous articleमहाराष्ट्रात भाजप मनसे युतीचा नवा अध्याय सुरू होणार ?
Next articleसत्कार :- आरोग्य सहाय्यीका शारदा बोरकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्य सत्कार ! 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here