Home गडचिरोली चिंतनिय:- एकुलत्या एक मुलीच्या भेटीसाठी तळपणाऱ्या विकासची आष्टी ठाणेदार दखल घेणार का...

चिंतनिय:- एकुलत्या एक मुलीच्या भेटीसाठी तळपणाऱ्या विकासची आष्टी ठाणेदार दखल घेणार का ?

मुलीच्या वाढदिवशी विकास चा मुलीच्या भेटीसाठी टाहो.

आष्टी :-

बापाचं मुलींवर किती प्रेम असतं हे बापाशिवाय दुसरा कुणी समजू शकणार नाही, कारण मुलीचे हट्ट पुरविणारा बापाचं असतो आणि बापामुळे मुलीचं सगळं विश्व असतं, पण अशाच एका बापाला मुलींपासून वेगळं करणारे तिच्या आई सह आष्टीचे ठाणेदार मुलीच्या वाढदिवशी तरी मुलीला बापाची भेट घडवेल का ? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. कारण आई वडीलाच्या भांडणात ठाणेदार यांची भूमिका असल्याने विकास नावाचा बाप 24 एप्रिल च्या मुलीच्या वाढदिवशी मुलीला भेटण्यासाठी व तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तिचं हक्काचं गिफ्ट देण्यासाठी किती आतुर असेल याचा विचार न केलेलाच बरा, कारण विकास आपल्या मुलीला भेटण्यासाठी मागील तीन महिन्यांपासून तडपत आहे व मुलीला भेटू देत नाही म्हणून पोलीस प्रशासनाशी झगडत आहे, पण पत्नीचं पतिवरच प्रेम हरपल्याने पत्नी मात्र मुलीला तिच्या बापाला भेटू देत नाही व मोबाईलवर बापाचा मोबाईल क्रमांक रिजेक्ट मधे टाकून मुलीला बापाचं प्रेम मिळू देत नाही त्यामुळं बाप मुलीच्या भेटीसाठी टाहोफोडत आहे ही शोकांतिकाचं म्हणावी लागेल.

प्रसंग आहे आष्टी या गावांतील एका पती पत्नीच्या वादाचा आणि पतीला घराबाहेर काढून व पोलिसांच्या माध्यमातून धमकावून मुलींपासून वेगळं करण्याचा. खरं तर पती पत्नीच्या वादात ठाणेदारांनी पडावं म्हणजे त्यांचा काही विशेष उद्देश असणारं, आणि हों असंचं काहीसं प्रकरण घडलंय किंव्हा घडवल्या गेलं आणि विकास ला मुली समोर अपमानित करून घराबाहेर हाकलून लावण्यात आलं, त्यात विकास चं काय चुकलं हे माहीत नाही पण त्याच्या पत्नीची खेळी मात्र यशस्वी झाली आणि एका इनोसेंट मुलीला बापापासून वेगळं करण्यात आलं ते दुःख, तो विरह बाप कसा सहन करत असेल यांची कल्पना करणं सुद्धा दुःखद आहे करणं बापाचा आत्मा मुलीच्या विराहाने तळपतोय हे मात्र पोलिसांना कळू नये? हे दुर्भाग्यच म्हणावं लागेल.

आष्टी चे ठाणेदार स्वतःला दबंग समजतात खरे, पण ते या प्रकरणात हस्तक्षेप करून स्वतःची इभ्रत वेशीला टांगत आहे पण आताही वेळ गेली नाही जर खरोखरच त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव झाली असेल तर त्यांनी 24 एप्रिल ला विकास सोबत त्याच्या मुलीच्या वाढदिवशी भेट घडवून द्यावी एवढीच आर्त हाक विकास ची असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here