Home Breaking News आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत पोराचा मोफत प्रवेश होईल का साहेब ?

आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत पोराचा मोफत प्रवेश होईल का साहेब ?

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बुधवार, दि. १२ एप्रिलपासून मोबाइलवर एसएमएस पाठविले जात आहेत. निवड झालेल्या शाळांमधील प्रत्यक्ष प्रवेश १३ एप्रिलपासून २५ एप्रिलपर्यंत सुरु आहेत; परंतु अनेक पालकांना अद्याप संदेश आला नसल्याने आपल्या पाल्याचा नंबर लागणार की नाही, अशी भीती पालकांना सतावत आहे; परंतु दरवर्षी आरटीईच्या दोन ते तीन लॉ काढण्यात येतात. त्यामुळे पुन्हा प्रवेशांची संधी आहे.

१८६ शाळांत १५०३ विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रवेश

 

 

चंद्रपूर जिल्ह्यात आरटीईअंतर्गत १८६ शाळांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये १ हजार ५०३ जागा रिक्त ठेवल्या आहेत.

तांत्रिक

अडचणीमुळे पालक हैराण

आरटीई प्रवेशासाठी काहींना एसएमएस आले नाहीत. अॅडमिशन करण्यासाठी साईड चालत नाही. कागदपत्रे अपलोड होत नाहीत. अशा तांत्रिक कारणामुळे अडचण निर्माण होत आहे..

४८३० पैकी केवळ १४५६

अर्जच ठरले पात्र

आरटीईअंतर्गत १८६ शाळेत १५०३ जागेसाठी ४८३० अर्ज आले होते; परंतु त्यापैकी केवळ १ हजार ४५३ अर्जच पात्र ठरले आहेत.

२५ एप्रिलची डेडलाइन

५ एप्रिलला आरटीईची पहिली लॉटरी काढण्यात ‘आली. १२ एप्रिलपासून प्रत्यक्ष प्रवेशास सुरुवात झाली आहे. २५ एप्रिलपर्यंत ही प्रवेश फेरी चालणार आहे. या कालावधीत प्रवेश घ्यायचा आहे.

आतापर्यंत केवळ २६८ प्रवेश निश्चित

जिल्ह्यात १८६ शाळेत १५०३ जागा रिक्त होत्या.

त्यासाठी ४ हजार ८३० अर्ज आले होते. त्यापैकी १४५६ अर्ज पात्र ठरले. त्यातील २६८ जणांचा प्रवेश निश्चित झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here