अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- गेल्या 15 ते 20 वर्षापासून बस स्थानकामागील पटेल नगर मध्ये गरीब गरजू लोकाची एक छोटीशी वस्ती आहे त्यात कित्येक तरी गोर गरीब वेगवेगळ्या समाजाचे लाहान मोठे व्यवसाय करून आपले व आपल्या परिवाराचे पालन पोषण करीत आहे आणि हे सर्व लोक आपआपल्या सोईनुसार ईथे 130 ते150 घरे आणि काहीं झोपड्या बांधून राहत आहे परंतु अचानक कोणतीही पूर्व सूचना किव्हा नोटीस न देता रेल्वे विभागातील आधिकार्यानी झोपड्या पाडण्याचे तोंडी आदेश दिले होते आणि हा आदेश ऐकल्यावर या गरीब लोकांच्या पाया खालची मातीस सरकली कारण कशेतरी हे लोक हातावर आणून पानांवर खाणे चालू असता एकाएकीं इतके मोठे संकट बघून यांना खूप मोठा झटका लागला परंतु अश्या वेळेस म्हणते ना देव तारी त्याला कोण मारी यांना देवदूत म्हणून येथील माझी नगरसेवक कासनगोट्टीवार धावून आले होते त्यांनी त्याबद्दल तात्काळ माननीय पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे कार्यालयात लेखी तक्रार दिली होती त्यावेळी तात्काळ भाऊंचे पीए यांनी दखल घेतली होती व त्यावेळी माननीय अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री देशपांडे साहेब याची भेट घेऊन घरे पाडण्यावर स्थगिती देण्याच्या आदेश दिला होता या आदेशामुळे येथील लोकांच्या मनात शांतीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु येथील नगरसेवक इथेस थाबले नाही त्यानि या विषयाच्या पाठ पुरावा करत ना सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यामागे लागून आज पुन्हा दिनांक,11,05,2023,ला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त ,व रेल्वे अधिकारी यांच्याशी बेठक लावण्यात आली आहे आणि येथील नागरिकांना इतका तर विश्वास आहेस की कासनगोट्टीवार आमच्या सोबत असल्यावर आम्हाला यातून कोणता ना कोणता मार्ग नक्की काढून देणार.