Home भद्रावती राजकीय :- रोहीत वाभिटकर याची अगोदरच मनसेतून हाकलपट्टी.

राजकीय :- रोहीत वाभिटकर याची अगोदरच मनसेतून हाकलपट्टी.

दोन वर्षात पक्षाची कामे न केल्याने सहा महिन्यापूर्वीच केले होते पक्षातून दूर

भद्रावती :-

भद्रावती तालुक्यात मनसेचे तालुका अध्यक्ष रोहित वाभिटकर याची मनसे पक्षातून अगोदरच हाकलपट्टी करण्यात आली होती, परंतु कुण्या कार्यकर्त्याला असे अपमाणित करून बेदखल करण्याची मनसेत परंपरा नसल्याने नवीन तालुका अध्यक्ष नियुक्ती केल्यानंतरच त्याची सगळीकडे चर्चा केली जाते पण पदावर नसताना व पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रम उपक्रम यामध्ये मागील वर्षभरापासून सहभागी नसलेल्या रोहित वाभिटकर याला मनसेचे तालुका अध्यक्ष असल्याची बतावणी करून त्याचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश झाला असल्याच्या बावट्या उठवल्या जात आहे ते एक आश्चर्यच असून मनसेत अनेक कार्यकर्ते हे उच्चंशिक्षित व प्रभावी नेतृत्व करणारे असताना रोहित वाभिटकर सारख्या अल्पबुद्धिजीवी व राजकीय समज नसलेल्या व्यक्तीचा शिवसेनेत प्रवेश दाखवून मनसेला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे असे मत पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार यांनी व्यक्त केले,

वरोरा भद्रावती विधनासभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाढती ताकत बघता अनेक राजकीय पक्षांच्या सम्भावीत उमेदवाराना धडकी भरली आहे, कारण या क्षेत्रात गोरगरीब, शेतकरी, कामगार यांचे प्रश्न घेऊन मनसेच रस्त्यावर उतरत आहे, त्यामुळे मनसेचा प्रभाव वाढत असल्याने कुठेतरी पक्षातुन दूर केलेल्याना पक्षात प्रवेश घेऊन ते पक्षाचे पदाधिकारी आहेत असे दाखवल्या जात आहे व त्यांचा प्रवेश दाखवून मनसेला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे, तो हानून पाडू व पक्षाला तालुका स्थरावर व शहरांत चांगले युवा नेतृत्वाला संधी देऊ असा विश्वास सुद्धा मनसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार यांनी व्यक्त केला. दरम्यान आपण पक्षांबाहेर गेल्याने पक्ष संपेल व आपल्यामुळेच पक्ष आहे अशा भ्रमात असलेल्यांनी स्वतःचे राजकीय भविष्य काय आहे याचे विचार मंथन करावे अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यानी दिली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here