Home वरोरा ब्रेकिंग :- शिवसेना वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरीकर यांच्यावर प्राणघातक हल्ला.

ब्रेकिंग :- शिवसेना वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरीकर यांच्यावर प्राणघातक हल्ला.

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचारात विरोधकांची खेळी?

वरोरा प्रतिनिधी :-

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरीकर यांच्यावर अनोळखी इसमानी काल रात्री 11. 30 ते 12.00 च्या दरम्यान वरोरा -भद्रावती विधानसभा मध्यवती कार्यालय वरोरा नागपुर नाका चौक येथुन कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रचार आटपवुन घरी जात असताना देशपांडे पेट्रोल पंपासमोर प्राणघातक हल्ला करण्यात आला असुन ही विरोधकांची खेळी असल्याचे बोलल्या जात आहे.

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराची रनधुमाळी सुरु असताना व प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना या निवडणूकीतील उमेदवारावर जिवघेना हल्ला होणे म्हणजे विरोधकांची राजकीय नीतिमत्ता किती खालच्या पातळीवर गेली याचा अंदाज येत आहे, राजकारणात विरोध होत असतो पण तो विचाराचा विरोध असतो पण वरोरा भद्रवती विधानसभा क्षेत्रात काही गुंड प्रवृत्ती आपली राजकीय सत्ता अबाधित राखण्यासाठी गुंडशाहीवर उतरली असल्याने इथे राजकीय वैर कुणाच्या जीवावर बेतेल याचा नेम नाही, दरम्यान दत्ता बोरीकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असून हा हल्ला कुणी केला त्याचा शोध पोलिसांनी लवकर घ्यावा व त्या गुंडाना बदडून काढावे अशी मागणी होत आहे,

दत्ता बोरीकर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती कारण्यात आले आहे. दरम्यान शिवसेना पदाधिकारी आता आक्रमक झाले असून या घटनेचे पडसाद जिल्हाभर उमटणार असल्याने त्यांची पुढील काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here