44 उमेदवार 5 वर्षांसाठी अपात्र
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हाप्रतिनिधी
गोंदिया:- पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा खर्च 44 उमेदवारांनी सादर केला नाही. 30 दिवसांची मुदत असताना आणि त्यानंतर वेळ देऊनही दुर्लक्ष केल्याने आता विभागीय आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई केली. येणारी पाच वर्षे त्या उमेदवारांना निवडणूक लढण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
गतवर्षी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक घेण्यात आली. ओबीसी आरक्षणाच्या तिद्यामुळे दोन टप्प्यांत निवडणूक पार पडली. त्यानंतर एकत्रितरित्या निकाल जाहीर करण्यात आला.
जिल्हापरिषदेच्या 53 जागांकरिता 322, तर पंचायत समितीच्या 106 जागांसाठी 543 उमेदवार रिंगणात होते. निवडणूक पार पडल्यानंतर 30 दिवसांच्या आत निवडूक लढणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्च निवडणूक विभागाला सादर करणे बंधनकारक
सुनावणीलाही हुलकावणी
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक 2021-22 मध्ये पार पडली. उमेदवारांनी खर्च जमा केला नसल्यामुळे त्यांची सुनावणी 24 नोव्हेंबर 2022 रोजी ठेवण्यात आली होती. मात्र सुनावणीला देखील अनुपस्थित राहिल्यामुळे त्या उमेदवारांवर कारवाई करण्यात आली.
होते. अन्यथा निवडून आलेल्या सदस्यांची सदस्यता रद्द, तर पराभूत उमेदवारांना येणारी पाच वर्षे निवडणूक लढण्यास बंदी घालण्याची तरतूद आहे. असे असताना देखील पराभूत 44 उमेदवारांनी खर्च सादर केला
नसल्यामुळे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 15 (ब) (1) नुसार येणारी पाच वर्षे निवडणूक लढण्यास बंदी घालण्याचा निर्णय दिला.
यांचा आहे समावेश
ज्या उमेदवारांवर कारवाई करण्यात आली त्यात बबिता देवधारी, सकुबाई उईके, विजेंद्र कोडापे, सुरेश टेकाम, हसनलाल टेकाम, डुमन धुर्वे, बबिता गजभिये, साधना गजभिये, डिलेश्वरी बनोटे, देवकाबाई वरकडे, निशा गेडाम, अर्चना नांदगाये, रामेश्वरी बोमचेर, अनिल कोडापे, शालिकराम परतेती, लता इळपाचे, वनिता मडावी, तरुण कनोजिया, भुपेशकुमार गायधने, कृष्णा बावने, गंगाराम बावनकर, विनोदकुमार मेश्राम, विजयकुमार नागपुरे, माधुरी वैद्य, सुरेशा बागड़े, बाबुलाल पंचभाई, विजेंद्रकुमार मेश्राम, दिनेश वाघमारे, मुलचंद भोयर, हिरेंद्र चौधरी, हावसीलाल बोपचे, हरिचंद रहांगडाले, मेघा रंगारी, गजानन रेवतकर, चंद्रकला कटरे, रमन मेश्राम, संदीप सोनवाने, वर्षा मलकाम, प्रतीमा सलामे विणा भांडारकर, मिथून टेंभुर्णे, योगिता सांगोळकर, संतोष मेश्राम, दुर्गा ठाकरे यांचा समावेश आहे.