Home चंद्रपूर चंद्रपुरात मुसळधार पावसाची शक्यता ?

चंद्रपुरात मुसळधार पावसाची शक्यता ?

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  भारतीय हवामान खात्याने IMD चंद्रपूर जिल्ह्यात दि. 28 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी व जिल्ह्यातल एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, वादळ वारा (वेग 40-50 कि.मी. प्रति तास) गारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून दि. 1 ते 2 मे 2023 या दिवसांकरीता यलो अलर्ट व दि. 28 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीकरीता आँरेज अलर्ट जारी केला आहे.

याअनुषंगाने नागरीकांनी विषेशतः शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घ्यावी. पाऊस व गारपिटीचा अंदाज लक्षात घेता रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील (हरभरा, गहू, मोहरी, जवस इत्यादी.) पिकाची आवश्यक काळजी घ्यावी. विजगर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. Orange alert

शेतात कामाला जात असतांना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. विजगर्जना सुरु असतांना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व विजगर्जना होत असतांना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असतांना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. जनावरांना मोकळ्या जागेत चारावयास सोडण्याचे टाळावे तसेच गोठ्यामधेच चारा व पाण्याची उपलब्धता करुन द्यावी.

नागरिकांनी व शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे, शेतातील पिकांची, जनावरांची आवश्यक काळजी घ्यावी व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here