Home Breaking News पाणी पुरवठा मधील पाईपलाईन चे लोखंडी पाइप चोरांना अटक न्यायालयाने सुनावली दोन...

पाणी पुरवठा मधील पाईपलाईन चे लोखंडी पाइप चोरांना अटक न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची कोठडी

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर :-  बल्लारपूर येथील बालाजी वॉर्डातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे जुने लोखंडी पाइप चोरीची घटना घडली. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारा नवीन पाइपलाइन बसविल्यानंतर जुनी पाइपलाइन तशीच भंगार अवस्थेत टाकीच्या बाजूने पडलेली होती. अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे सुनावली. बघून भंगार चोरांनी १५ लोखंडी पाइप तेथून उचलून नेले. यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास

करून यातील आरोपी अनिकेत गायकवाड, साहिल सिंघनवार व अमित घोडके या युवकांना अटक केली. त्यानंतर राजुरा न्यायालयात गुरुवारी हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी

चोरलेले पाइप या आरोपींनी कोणत्या भंगार दुकानदाराला विकले जीवन याचा तपास पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे हवालदार रणविजयसिंग ठाकूर करीत आहेत.

Previous articleDNR ( डी. एन. आर. ) ट्रॅव्हल्स मधून बॅग चोरी,खाजगी ट्रॅव्हल्स मालक, चालक, वाहक आणि व्यवस्थापक विरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल.
Next articleतेजस्विनी पत संस्थेच्या अध्यक्षासह संचालकांवर गुन्हे दाखल करा-मनसे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here